Shet Rasta Magni Arj शेतात जाण्यासाठी रस्ता नाही ? मग असा करा अर्ज, नंतर कोणीही तुमचा रस्ता अडवणार नाही.

Shet rasta kayda नमस्कार मित्रांनो आज आपण आपले या पोस्टमध्ये आपले शेतकरी बांधवांना शेतात त्यांना जाण्यासाठी रस्ता नसेल तर यासाठी कायदेशीर अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे आणि हा अर्ज केल्यानंतर किती दिवसांमध्ये तुम्हाला शेतात जाण्यासाठी रस्ता मिळणार आहे आणि काय याची प्रोसेस आहे हे आज आपण या पोस्ट अंतर्गत आपल्या सर्व शेतकरी बांधवांना सांगणार आहोत. मित्रांनो आपण बऱ्याच जागेवर पाहत आहोत की शेतात जाण्यासाठी रस्त्यावरून खूप शेतकऱ्यांचे दररोज आणि कधीही वाद चालू असतात पण मित्रांनो तुम्हाला माहिती नसेल किंवा असेलही कदाचित की शेतात जाण्यासाठी तुम्हाला जर एखाद्या शेतकऱ्यांनी आपला रस्ता अडवला तर आपण कायदेशीर अर्ज करून आपल्या हक्काचा रस्ता मिळू शकतो आणि ही पद्धत एकदम सोपी असून शासनाने यासाठी एक कायदा सुद्धा काढलेला आहे तर मित्रांनो चला तर जाणून घेऊया यासाठी कशा पद्धतीने अर्ज आपल्याला करता येणार आहे.

 

शेत रस्ता मागणीसाठी अशा प्रकारे करा अर्ज, पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

 

Shet rasta magni arj शेती करत असताना बरेचसे समस्यांना शेतकऱ्यांना समोर जावे लागते कधी कधी तर आपल्या शेतामध्ये जाण्यासाठी रस्ता सुद्धा नसतो. आणि मग हा हक्काचा रस्ता आपल्याला मिळणार कसा या विचारात शेतकरी मित्र हे कायम टेन्शनमध्ये असतात. आणि त्याचप्रमाणे शेतामध्ये उत्पादन हे महत्त्वाचे आहे अगदी त्याचप्रमाणे शेत रस्ता देखील खूप महत्त्वाचा आहे त्यामुळे कायदेशीर रस्ता नेमका कसा आपल्याला मिळणार आहे आणि त्यासाठी काय आपल्याला करावे लागणार आहे याची माहिती आज आपण या पोस्ट अंतर्गत तुम्हाला देणार आहोत. शेतीमालाला चांगला भाव मिळत नसल्याने ही एक मोठी समस्या शेतकऱ्यांसाठी आहेच पण शेतीसाठी लागणारा रस्ताही शेतकऱ्यांना मिळत नाही आणि हा जर रस्ता नसेल तर आपल्या शेतीमाला आपल्याला बाहेर विक्रीसाठी काढता येत नाही आणि उगीचच आपले दुसऱ्या शेतकऱ्यासोबत वाद ही होत असतात. पण हे वाद न घालता कायदेशीर रित्या आपल्याला रस्ता मिळणारच आहे कारण की यासाठी कायद्याने एक अर्ज आपल्याला करता येणार आहे आणि आपल्याला कायदेशीर आपल्या हक्काचा रस्ता मिळणारच आहे.

 

शेत रस्ता कायदा जाणून घ्या.

मित्रांनो वडिलोपार्जित जमिनीचे पुढे बऱ्याचशा भागात विभागणी होत असते यामुळे शेतीसाठी जो रस्ता आहे याचा मोठा प्रश्न इथे निर्माण होतो. आणि हाच शेती रस्त्यासाठी शेतकरी कायद्याचा आधार घेऊ शकतात आणि या पद्धतीने एकदम हक्काचा रस्ता आपण त्यासाठी अर्ज करू शकतो. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1996 च्या कलम 143 अन्वये या कायद्याच्या मदतीने शेतकरी त्यांच्या शेत रस्त्यासाठी अर्ज कधीही करू शकतात. यासाठी शेतकरी मित्रांना तहसीलदाराकडे एक लिखित स्वरूपात अर्ज करायचा असतो आणि अर्जामध्ये पूर्ण माहिती लिहिणे अनिवार्य आहे या कायद्याच्या मदतीने शेतकऱ्यांना हक्काचा रस्ता हा मिळणार आहे. आणि मित्रांनो यासाठी एक अर्जाचा नमुना आठवण तुम्हाला डाऊनलोड करावा लागणार आहे आणि हा अर्जाचा नमुना आणि या पोस्टमध्ये जी लिंक दिलेली आहे त्या लिंक वर क्लिक करून तुम्हाला हा अर्जाचा नमुना मिळणार आहे.

 

 

हे पण वाचा, वडिलांनी किंवा आजोबांनी जमीन विकली असेल तर मिळेल 2 दिवसात परत.

 

 

 

अर्ज करण्यासाठी ही लागतील कागदपत्रे. Shet Rasta Magni Arj important documents

मित्रांनो तुम्हाला अर्ज करायचा असल्यास कागदपत्रांचे बोलायचे झाल्यास अर्जदाराचा आणि आपल्या शेजारील जो शेतकरी आहे त्याच्या जमिनीच्या बांधावरून रस्त्याची मागणी केली आहे त्या जमिनीचा कच्चा नकाशा.

तुमच्या जमिनीचा सातबारा

शेजारी शेतकऱ्यांची नावे त्यांचे पत्ते आणि त्यांच्या जमिनीचा पूर्णपणे तपशील.

अर्जदार शेतकऱ्यांच्या जमिनीचा न्यायालयात काही वाद सुरू असेल तर त्याची पूर्णपणे माहिती आणि त्याचे डॉक्युमेंट्स.

 

रस्त्याची गरज आहे का ? कशा पद्धतीने केली जाते पाहणी ?

मित्रांनो आपण अर्ज केल्यानंतर शेजारच्या शेतकरी नोटीस पाठवून त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी संधी एक दिली जात असते तसेच शेतकऱ्याला रस्त्याची खरोखरच गरज आहे का ? ही तहसीलदार यांच्याकडून प्रत्यक्ष घटनास्थळी येऊन पाहणी केली जाते म्हणजे तुमच्या शेतीच्या बांधावर येऊन ते स्वतः सर्व चेक करून पाहून जातात आणि मग या अर्जावर निर्णय होत असतात. तर मित्रांनो हा अर्ज कशा पद्धतीने करायचा तसेच अर्जाचा नमुना डाऊनलोड तुम्हाला करायचा असल्यास खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

 

 

शेत रस्ता मागणीसाठी अशा प्रकारे करा अर्ज, पाहण्यासाठी इथे क्लिक करा.