Government Schemes Update नमस्कार मित्रांनो, तुम्हाला सरकारी योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर सर्वात अगोदर आधार कार्ड मागितली जाते असं सर्वांनाच वाटतं पण आता आधार कार्ड आपल्याकडे नसले तरी सुद्धा चालणार आहे आणि आपल्याला सरकारी योजनांचा लाभ मिळणार आहे. यासाठी दिल्ली सरकारकडून नागरिकांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला असून तो असा आहे की यापढे आता आधार कार्ड नसेल तरीसुद्धा आपल्याकडे मतदार ओळखपत्र तसेच ड्रायव्हिंग लायसन्स किंवा पासपोर्ट यापैकी कुठलेही एका कागदपत्राचा वापर करून आपल्याला सरकारी योजनांचा लाभ घेता येणार आहे. त्यामुळे आधार कार्ड नसले तरी सुद्धा चालणार आहे.
काय आहे शासनाचा नवीन निर्णय..??
मित्रांनो शासनाकडून घेण्यात आलेल्या नवीन निर्णयाप्रमाणे आता सर्व शासकीय योजना घेणारे जिल्हा भरती आहेत त्यांची माहिती एकाच संकेतस्थळावर ठेवली जाणार आहे आणि यासाठी सिटीजन डेटा प्लॅटफॉर्म म्हणून एक वेबसाईट तयार करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे.
आधार कार्ड ची गरज नाही..!!
या नव्या निर्णयामुळे आता सर्वात महत्त्वाची गोष्ट समोर आलेली आहे ती म्हणजे आधार कार्ड आपल्याकडे नसेल तरीसुद्धा चालणार आहे आपलं कुठलंही ओळखपत्रावर आपलं काम आता होणार आहे. एखाद्या व्यक्तीकडे आधार कार्ड नाही आणि त्याला सरकारी योजना चा लाभ पाहिजे असेल तरीसुद्धा तो आपलं ऐच्छिक कागदपत्र म्हणजेच मतदान कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स किंवा पासपोर्ट इत्यादी देऊन सुद्धा शासकीय योजना चा लाभ घेणार आहे..
ही कागदपत्रे चालतील..
मित्रांनो आधार कार्ड तुमच्याकडे नसेल तर सर्व शासकीय योजनांचा लाभ घ्यायचा असेल त्यासाठी खालील कागदपत्रे त्यापैकी कोणतीही एक असला तरी चालेल..
1) ड्रायव्हिंग लायसन्स
2) मतदान कार्ड
3) पासपोर्ट
4) राज्य सरकार किंवा केंद्र सरकारकडून मिळालेले ओळखपत्र
नागरिकांना यामुळे होणार फायदा.
मित्रांनो या नवीन निर्णयामुळे शासकीय योजना ज्या आहेत त्यामधील पारदर्शकता वाढणार आहे. तसेच एका व्यक्तीच्या नावावर किती शासकीय योजनांचा लाभ मिळालेला आहे हे देखील एकदम अचूक पद्धतीने शासनाला पाहता येणार आहे आणि हा गैरप्रकार देखील रोखता येणार आहे.