मित्रांनो दहावी बारावीच्या परीक्षांमध्ये सरकारने केलेले बदल खालील प्रमाणे आहेत. Board Exam Update 2023
विद्यार्थी मित्रांनो 2023 मध्ये होणाऱ्या बारावी आणि दहावीच्या परीक्षा हे त्यांचे पूर्ण अभ्यासक्रमावर आधारित होणार आहेत.
दहावी आणि बारावीच्या 2023 मध्ये होणाऱ्या परीक्षा ह्या त्यांच्या होम सेंटरमध्ये होणार नाहीत. तसेच विद्यार्थ्यांना बोर्डाकडून जी सेंटर मिळालेली आहे त्या सेंटरवर विद्यार्थ्यांना परीक्षा द्यायला आता जावे लागणार आहे.
कमी कमी 80 टक्के मार्क्सच्या पेपरसाठी दिलेला जास्त वेळ म्हणजेच अर्धा तास यावर्षी दिला जाणार नाही. याचाच अर्थ असा की विद्यार्थ्यांना 80 टक्के गुणाचा पेपर आता फक्त अडीच घंट्यांमध्ये सोडावा लागणार आहे.
तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारचे नवीन फेरबदल सरकारने दहावी बारावीच्या परीक्षांबद्दल केलेल्या असून याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.