School Timing New Rules शाळांच्या वेळेबाबत नवे आदेश: सकाळी ९ पूर्वी शाळा भरवल्यास थेट कारवाईचा इशारा ; महाराष्ट्र शासनाने विद्यार्थ्यांच्या आरोग्य व अभ्यासावर होणाऱ्या परिणामांमुळे शाळांच्या वेळेबाबत कठोर पावले उचलली आहेत. शाळा सकाळी ९ वाजेनंतर सुरू करणे बंधनकारक असल्याचे आदेश शिक्षण विभागाने दिले असून, याचे पालन न करणाऱ्या शाळांवर थेट कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
School Timing New Rules आदेशाचे पालन न करणाऱ्या शाळांवर कारवाई
राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने केलेल्या अभ्यासानुसार, हिवाळा व पावसाळ्यात लवकर उठून शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये आजारी पडण्याचे प्रमाण वाढत असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे मागील वर्षी शासनाने सकाळी ७ ऐवजी ९ वाजेनंतर शाळा सुरू करण्याचा आदेश काढला होता. मात्र, काही शाळांकडून या नियमांचे पालन होत नसल्याने शासनाने यंदा पुन्हा आदेश काढून सकाळी ९ पूर्वी शाळा सुरू केल्यास कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
हे सुद्धा नक्की वाचा:- 10 वी , 12 वी बोर्ड परीक्षांसाठी महत्वाचे मोबाइल मोबाईल ॲप सुरू; लगेच करा डाउनलोड |
विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर परिणाम
सकाळी ९ वाजेपूर्वी वर्ग भरल्यास विद्यार्थ्यांची झोप अपुरी राहते. यामुळे चिडचिड, थकवा, आणि आरोग्यासंबंधी समस्या वाढत असल्याचे निरीक्षण शिक्षण विभागाने केले आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने सर्व शाळांना सकाळी ९ वाजेनंतरच वर्ग भरवण्याचे आदेश दिले आहेत.
संस्थाचालकांची नियम न पाळण्याची तक्रार
काही शाळा दोन शिफ्टमध्ये वर्ग भरवितात, त्यामुळे सकाळी ७ वाजल्यापासूनच शाळा सुरू केल्या जातात. यामुळे विद्यार्थ्यांवर ताण येतो. हा प्रकार थांबवण्यासाठी शिक्षण विभागाने कडक पावले उचलली असून, आदेशांचे पालन न करणाऱ्या शाळांवर थेट कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले आहे.
राज्यपालांच्या सूचनेनंतर निर्णय
मागील वर्षी ५ डिसेंबर रोजी राजभवनात झालेल्या कार्यक्रमात तत्कालीन राज्यपाल रमेश बैस यांनी शाळांच्या वेळेबाबत विचार करण्याचे आवाहन केले होते. यानंतर राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडून सविस्तर अभ्यास करण्यात आला. त्यावर आधारित शाळांची वेळ सकाळी ९ नंतर ठेवण्याची शिफारस करण्यात आली.
विद्यार्थ्यांच्या भल्यासाठी महत्त्वाचा निर्णय
विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि शिक्षण दोन्ही सुरळीत राहावे, यासाठी हा निर्णय घेतल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. सर्व शाळांनी या आदेशांचे पालन करावे आणि विद्यार्थ्यांच्या भल्यासाठी शासनाच्या निर्णयाचे समर्थन करावे, असे आवाहन देखील करण्यात आले आहे.
शाळा व्यवस्थापनाने याबाबत जागरूक राहून विद्यार्थ्यांच्या हितासाठी शासनाच्या आदेशांचे पालन करणे अनिवार्य आहे.