child education schemes प्रत्येक पालकाचे स्वप्न असते की, त्यांच्या मुलांना उत्तम शिक्षण मिळावे आणि त्यांचे भविष्य उज्ज्वल व्हावे. मात्र, आजकाल शिक्षणाचा खर्च झपाट्याने वाढत चालला आहे. यामुळे पालकांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. मुलांच्या शिक्षणाचा खर्च व्यवस्थापित करण्यासाठी योग्य वेळी योग्य आर्थिक योजना निवडणे गरजेचे आहे. खालील ४ सर्वोत्तम योजना तुम्हाला या समस्येवर तोडगा काढण्यासाठी मदत करतील.
१. बाल युलिप (Child ULIP child education schemes)
बाल युलिप योजना मुलांच्या शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी एक उत्कृष्ट पर्याय आहे. यामध्ये शिस्तबद्ध गुंतवणूक, विमा संरक्षण आणि इक्विटी मार्केटमधील वाढीचे फायदे एकत्र मिळतात. मुलाचे वय १८ वर्षे पूर्ण झाल्यावर या योजनेचा लाभ मिळतो. विशेष म्हणजे पालकाच्या मृत्यूनंतर विम्याची रक्कम मुलाला दिली जाते, ज्यामुळे शिक्षणाचा खर्च नियमित राहतो.
२. एंडोमेंट योजना (Endowment Plan child education schemes)
एंडोमेंट योजना तुम्हाला हमखास परतावा आणि जीवन विमा संरक्षण दोन्ही प्रदान करते. या योजनेअंतर्गत विमा रक्कमेवर बोनसच्या स्वरूपात परतावा मिळतो. मूल १८ वर्षांचे झाल्यानंतर, बोनससह विमा रकमेच्या २५% प्रमाणे चार हप्त्यांमध्ये पेमेंट केले जाते. दीर्घ मुदतीसाठी ही योजना अत्यंत उपयुक्त आहे.
३. सुकन्या समृद्धी योजना (Sukanya Samriddhi Yojana child education schemes)
जर तुमच्या कुटुंबात १० वर्षांखालील मुलगी असेल, तर सुकन्या समृद्धी योजना हा उत्तम पर्याय आहे. या योजनेत फक्त २५० रुपयांनी खाते उघडता येते आणि एका आर्थिक वर्षात जास्तीत जास्त १.५ लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येते. या योजनेवरील व्याजदर सध्या ८.५०% आहे, जो खूपच आकर्षक आहे. याशिवाय, गुंतवणुकीवर करसवलतही मिळते.
४. एसआयपीद्वारे गुंतवणूक (Investment through SIP)
म्युच्युअल फंडामधील एसआयपी हा दीर्घकालीन गुंतवणुकीचा एक लोकप्रिय आणि फायदेशीर मार्ग आहे. मिड कॅप किंवा स्मॉल कॅप फंड निवडून तुम्ही चांगल्या परताव्याची अपेक्षा ठेवू शकता. या योजनेद्वारे मुलांच्या उच्च शिक्षणासाठी मोठी रक्कम सहज जमा करता येते.
मुलांच्या शिक्षणासाठी लागणारा वाढता खर्च हा पालकांसाठी मोठी समस्या ठरत आहे. मात्र, वरील योजनांमधून योग्य पर्याय निवडल्यास ही समस्या सोडवता येईल. तुम्ही तुमच्या गरजेनुसार योजना निवडून आजच गुंतवणूक सुरू करा आणि तुमच्या मुलांच्या उज्ज्वल भविष्याची हमी घ्या.
जर तुम्हाला वरील पैकी कोणतीही योजना तुमच्या मुलांसाठी चालू करायची असेल तर खालील क्रमांकर वर संपर्क करा;- +91-7517247468.(फक्त व्हॉटसप )
(अशोक सरपते) – [गुंतवणूक सल्लागार ]
हे सुद्धा नक्की वाचा:- तुमच्या मुलांच्या शाळेची वेळ बदलली आहे; शासनाचा नवीन आदेश; पहा किती वाजता भरणार शाळा..? School Timing New Rules