योजना कधीपर्यंत चालणार?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले आहे की, ‘लाडकी बहीण योजना’ कायमस्वरूपी चालू राहणार आहे. योजनेसाठी ४६ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत आतापर्यंत राज्यातील दोन कोटी २६ लाख महिलांच्या खात्यात रक्कम जमा करण्यात आली आहे, आणि ही रक्कम दरमहा महिलांच्या खात्यात नियमितपणे जमा होत राहणार आहे.
रक्कम कशी वाढणार?
सध्याच्या परिस्थितीत महिलांना दरमहा १,५०० रुपये मिळतात, परंतु ही रक्कम टप्प्याटप्प्याने वाढवून ती ३,००० रुपयांपर्यंत नेण्याचे आश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आहे. योजनेच्या माध्यमातून महिलांच्या आर्थिक स्थैर्याला हातभार लागेल आणि त्यांच्या आयुष्यातील अडचणी कमी होतील(Ladki Bahin Yojnechi Rakkam Kadhi Vadhnar).
हे सुद्धा नक्की वाचा:- आता गुंठा -गुंठा जमिनीची खरेदी विक्री करता येणार; राज्य सरकारचा मोठा निर्णय..? |tukda bandi kayda Maharashtra latest update