महाराष्ट्रात आचारसंहिता लागू..? पहा काय आहेत नवीन नियम सर्व सामान्य लोकांसाठी..? मतदान कधी आहे..? |code of conduct in Maharashtra

Code of conduct in Maharashtra 2024 for Vidhana Sabha election निवडणुका जाहीर झाल्या की आपल्या कानावर सतत येणारं एक वाक्य म्हणजे “आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे.” परंतु आचारसंहिता म्हणजे नेमकं काय आणि ती लागू होताच काय बदल होतात, हे जाणून घेणं आवश्यक आहे.

आचारसंहिता म्हणजे काय? code of conduct in Maharashtra

आचारसंहिता म्हणजे निवडणूक आयोगाने दिलेले नियम आणि अटी. भारतातील सर्व निवडणुका केंद्रीय निवडणूक आयोगाच्या माध्यमातून घेतल्या जातात, आणि या निवडणुका स्वच्छ, पारदर्शक, आणि निष्पक्ष व्हाव्यात यासाठी आयोग विशेष काळजी घेतो. निवडणूक जाहीर होताच आयोग सर्व राजकीय पक्ष आणि उमेदवारांसाठी काही नियम लागू करतो. या नियमांना “आचारसंहिता” म्हटलं जातं.

आचारसंहिता लागू झाल्यावर काय घडतं ?

राजकीय पक्ष आणि उमेदवारांनी या आचारसंहितेचे पालन करणं बंधनकारक असतं. जर कोणत्याही उमेदवाराने किंवा पक्षाने याचा भंग केला, तर निवडणूक आयोगाला त्या उमेदवाराविरोधात कारवाई करण्याचा अधिकार असतो. काही वेळा गंभीर नियम भंग केल्यास उमेदवाराची निवडणूक रद्द करण्यासारख्या कठोर कारवाईसुद्धा केली जाऊ शकते.

सत्ताधारी पक्षावर बंधने

आचारसंहिता लागू झाल्यानंतर सत्ताधारी पक्ष काही नवीन योजना जाहीर करू शकत नाहीत. उद्घाटन, लोकार्पण किंवा सरकारी योजनांचे भूमिपूजन यासारख्या कार्यक्रमांवर बंदी असते. तसेच सरकारी वाहने, बंगले किंवा इतर सरकारी सुविधा राजकीय प्रचारासाठी वापरू येत नाहीत. सत्ताधारी पक्षाला निवडणूक प्रचारात सर्वसामान्यांच्या भावनांशी खेळण्याची परवानगी नसते.

प्रचाराच्या नियमावली

आचारसंहितेनुसार, कोणत्याही राजकीय सभेचं आयोजन करण्यासाठी स्थानिक प्रशासनाची परवानगी घेणं गरजेचं असतं. कोणताही उमेदवार धर्म, जात, किंवा पंथाच्या आधारावर मतं मागू शकत नाही. धार्मिक किंवा जातीय भावना भडकावणं आचारसंहितेचा भंग मानला जातो, आणि यासाठी निवडणूक आयोग कठोर कारवाई करू शकतो.

सर्वसामान्यांसाठी काय बदलणार?

सामान्यपणे आचारसंहिता ही राजकीय पक्षांसाठी असली तरी काही बाबतीत तिचा सर्वसामान्यांवर अप्रत्यक्ष परिणाम होतो. मतदानाच्या दिवशी दारू दुकानं बंद ठेवावी लागतात, आणि मतदान केंद्राजवळ कोणत्याही राजकीय प्रचाराची परवानगी नसते. कोणत्याही प्रकारच्या आकर्षणांद्वारे मतदारांना प्रभावित करणं देखील आचारसंहितेचा भंग मानला जातो.

आचारसंहिता म्हणजे निवडणुका स्वच्छ आणि पारदर्शक ठेवण्यासाठी दिलेली नियमावली आहे. ही नियमावली सर्व उमेदवार आणि राजकीय पक्षांसाठी बंधनकारक असून, तिच्या उल्लंघनामुळे कठोर कारवाई होऊ शकते. सर्वसामान्यांनीही मतदानाच्या दिवशी काही नियमांचं पालन करणं गरजेचं आहे. आचारसंहितेचे पालन झाल्यास निवडणुका स्वच्छ, निष्पक्ष आणि लोकशाहीच्या मुल्यांना धरून होतात, यावर विश्वास ठेवावा.

महाराष्ट्र राज्यात विधानसभा निवडणूक कधी आहे ..? Maharashtra Vidhansabha Election dates

संपूर्ण महाराष्ट्रालाच नाही, तर संपूर्ण देशालाच उत्सुकता लागून राहिलेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीचा बिगुल अखेर वाजला आहे. महाराष्ट्रात 20 नोव्हेंबरला निवडणुका होणार असून, 23 नोव्हेंबरला मतमोजणी होईल. तसेच झारखंडमध्ये दोन टप्प्यांत निवडणुका पार पडणार आहेत. निवडणुकांच्या तारखा जाहीर होताच राज्यात आचारसंहिता लागू झाली आहे, ज्यामुळे राजकीय पक्ष आणि उमेदवारांना आता नियमांच्या चौकटीत राहूनच प्रचार करावा लागेल.

हे सुद्धा नक्की वाचा:- आता गुंठा -गुंठा जमिनीची खरेदी विक्री करता येणार; राज्य सरकारचा मोठा निर्णय..? |tukda bandi kayda Maharashtra latest update