Free Electricity Scheme गोरगरीब नागरिकांना तब्बल 25 वर्षे मिळणार मोफत वीज.!! राज्य सरकारची नवीन स्मार्ट योजना जाणून घ्या..

नमस्कार मित्रांनो, दारिद्र रेषेखालील आणि आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणाऱ्या ग्राहकांना त्यांच्या घरावरती सोलर पॅनल बसवण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाकडून मोठ्या प्रमाणात अनुदान मिळणार आहे. यामध्ये एकदम कमी खर्चात जवळपास 25 वर्षे मोफत वीज आपल्याला मिळणार आहे.

 

राज्य सरकारने ही स्मार्ट योजना सुरू केली असून दारिद्र रेषेखालील जवळपास दीड लाख तसेच आर्थिक दृष्ट्या दुर्बल असलेली जवळपास साडेतीन लाख तसेच महिन्याला शंभर युनिट पेक्षा कमी वीज वापरणाऱ्या पाच लाख घरगुती वीज ग्राहकांना मोफत वीज मिळावी याकरिता शासनाने ही स्मार्ट योजना आणली आहे. यासाठी जवळपास 655 कोटी रुपयांची तरतूद शासनाने केलेली आहे. महावितरण कडून नुकत्याच झालेल्या संचालक आणि मुख्य अभियंता यांच्या राज्यस्तरीय बैठकीमध्ये या योजनेला मंजुरी देण्यात आलेली आहे.

 

पंतप्रधान नरेंद्र जी मोदी यांच्या नेतृत्वामध्ये केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री सूर्यग्रह मोफत योजना सुरू केल आहे. यामध्ये ग्राहकांना जवळपास एक किलोवॅटच्या छतावरील सौर ऊर्जा प्रोजेक्ट बसवण्यासाठी 30 हजार रुपये अनुदान केंद्र सरकारकडून मिळेल. स्मार्ट योजनेमध्ये या अनुदाना मध्ये राज्य सरकारकडून सुद्धा वेगळे अनुदान मिळणार आहे. आणि त्यानंतर वीज ग्राहकांना अगदी कमी पैसे भरून ही प्रकल्प घरावरती बसवता येणार आहे.

 

या स्मार्ट योजनेच्या प्रमाणे दारिद्र रेषेखालील ग्राहकांना एक किलोवट चा सौर ऊर्जा प्रोजेक्ट घरावरती बसवण्यासाठी शासनाकडून तीस हजार रुपये आणि राज्य सरकारकडून जवळपास 17 हजार पाचशे रुपये इतकी अनुदान मिळेल. सरोजा प्रकल्पाची उरलेली रक्कम भरून ग्राहक 25 वर्षे मोफत विजेचा लाभ घेऊ शकणार आहे.