land purchase rules in Maharashtra शेती आणि शेतजमीन हे भारतीय अर्थव्यवस्थेचे महत्त्वाचे घटक आहेत. शेतीमधील उत्पादन घटत असले तरी शेतजमिन घेण्याची स्पर्धा वाढत आहे. केंद्र सरकार शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी विविध योजनांची अंमलबजावणी करत आहे, त्यामुळे शेतीकडे लोकांचा कल वाढलेला दिसतो. मात्र, शेतजमीन घेताना फसवणूक होण्याची शक्यता असते. यासाठी काही महत्त्वाच्या बाबी लक्षात घेणे अत्यावश्यक आहे.
1. शेत रस्ता
शेतजमीन खरेदी करताना सर्वात महत्त्वाचे आहे ती जमीन नकाशामध्ये दाखविलेल्या रस्त्याशी जोडलेली आहे का हे तपासणे. जर ती जमीन बिनशेती असेल तर जमीनीचा रस्ता नकाशात दाखवलेला असतो. परंतु रस्ता खाजगी असल्यास, संबंधित जमिनीच्या मालकांची संमती असल्याची खात्री करणे महत्त्वाचे आहे. रस्ता योग्य नसल्यास पुढील काळात अडचणी येऊ शकतात.
नवीन नियम पाहण्यासाठी इथे क्लिक करा
2. आरक्षित जमिनीची तपासणी
शेतजमिन खरेदी करताना शासनाच्या आरक्षित जमिनींबाबत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. उदा. हिरवा पट्टा, पिवळा पट्टा इत्यादी योजनांतर्गत जमीन आरक्षित असल्यास, तिच्या वापरावर निर्बंध असतात. यासाठी जमिनीवरील आरक्षणाबाबत योग्य ती माहिती घेणे महत्त्वाचे आहे.
3. सातबारा उताऱ्यावरील नावे
जमीन खरेदी करताना त्या जमिनीवरची नावे सातबारा उताऱ्यावर योग्य आहेत का, याची पडताळणी करावी. विक्री करणाऱ्या व्यक्तीचे नाव सातबारा उताऱ्यावर आहे का हे पाहणे आवश्यक आहे. मयत व्यक्तीचे किंवा जुन्या मालकाचे नाव असल्यास कायदेशीररित्या त्या नावे काढणे आवश्यक आहे. तसेच, जमिनीवर कोणत्याही बँकेचा बोजा नाही याची खात्री करणे गरजेचे आहे.
4. जमिनीची हद्द
land purchase rules in Maharashtra शेतजमिन खरेदी करताना तिची हद्द नकाशाप्रमाणे आहे का, हे तपासणे गरजेचे आहे. तसेच, शेजारील मालकांची हरकत नाही याची खात्री करावी. जर हद्दीविषयी काही वाद असेल तर भविष्यात त्याचा त्रास होऊ शकतो. याशिवाय, शेतजमिनीवर इतर कोणत्याही नावे आहेत का हे तपासणेही महत्त्वाचे आहे.
5. न्यायालयीन खटला आणि वकिलाचा सल्ला
जमिनीसंदर्भात कोणताही न्यायालयीन खटला प्रलंबित आहे का, याची खात्री करावी. अशा प्रकरणात योग्य वकिलाचा सल्ला घेणे अत्यावश्यक आहे, जेणेकरून भविष्यात कायदेशीर अडचणी टाळता येतील.
6. खरेदीखत
शेतजमिन खरेदी करताना सर्व आवश्यक कागदपत्रे पूर्ण करून खरेदीखत करण्यासाठी दुय्यम निंबधक कार्यालयात जावे. कागदपत्रांची पूर्तता करून खरेदीखत तयार करावे. नंतर, खरेदी केलेल्या जमिनीच्या नकाशावर तुमचे नाव आणि उताऱ्यावर नोंदणी झालेली आहे का हे तपासणे गरजेचे आहे. आर्थिक व्यवहार पूर्ण झाल्याशिवाय खरेदीखत करू नये.
शेतजमिन खरेदी करताना वर नमूद केलेल्या सर्व बाबींची काळजी घेणे आवश्यक आहे. यामुळे भविष्यातील अडचणी टाळता येतील आणि जमिनीच्या व्यवहारांमध्ये फसवणूक होण्याची शक्यता कमी होईल. जमिनीसंबंधित कोणताही निर्णय घेताना योग्य कायदेशीर सल्ला घेणे हे नेहमीच उत्तम राहते.
हे सुद्धा नक्की वाचा:- RBI चा मोठा निर्णय ; “या” नोटा होणार चलनातून बंद..? इथे पहा माहिती | RBI bank note policy