तुम्हाला माहिती आहे का..? महाराष्ट्र विधानसभा निवडणूकित महाराष्ट्रातील 10 मोठ्या नेत्यांचा पराभव; इथे पहा कोण आहेत ते..? Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024

Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 च्या निकालांनी आज (23 नोव्हेंबर) मोठी राजकीय उलथापालथ केली आहे. महायुतीने शानदार विजय मिळवला असून महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. अनेक दिग्गज नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.

दिग्गज नेत्यांचा पराभव : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल 2024

  • बाळासाहेब थोरात: संगमनेर मतदारसंघात काँग्रेसचे बळकटीकरण करणारे नेते बाळासाहेब थोरात यांना पहिल्यांदाच पराभवाचा सामना करावा लागला आहे.
  • पृथ्वीराज चव्हाण: कराड दक्षिणमधून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा भाजपच्या डॉ. अतुलभाऊ भोसले यांनी पराभव केला.
  • यशोमती ठाकूर: तिवसा मतदारसंघात काँग्रेसच्या माजी मंत्र्यांचा भाजपच्या राजेश वानखडे यांनी पराभव केला.
  • धीरज देखमुख: लातूर ग्रामीणमधून काँग्रेसच्या धीरज देखमुख यांना मोठ्या पराभवाचा धक्का बसला आहे.
  • रवींद्र धंगेकर: कसबा पेठमधून काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांचा भाजपच्या हेमंत रासने यांनी मोठा विजय मिळवला.
  • बच्चू कडू: अचलपूरमधून बच्चू कडू यांना महायुतीचे प्रविण तायडे यांनी पराभूत केले.
  • संजयकाका पाटील: तासगाव-कवठे-महांकाळमधून राष्ट्रवादीचे रोहित पाटील विजयी झाले, तर संजयकाका पाटील पराभूत झाले.
  • शशिकांत शिंदे: कोरेगाव मतदारसंघात राष्ट्रवादीच्या महेश शिंदे यांनी शशिकांत शिंदे यांना पराभूत केले.
  • राम सातपुते: माळशिरस मतदारसंघात राष्ट्रवादीचे उत्तमराव जानकर यांनी भाजपचे राम सातपुते यांचा पराभव केला.

महाविकास आघाडीसाठी मोठा धक्का

विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या अनेक प्रमुख नेत्यांचा पराभव झाल्याने महाविकास आघाडीला धक्क्यावर धक्के बसले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत यंदाच्या निवडणुकीत महायुतीचे यश अधिक ठळकपणे समोर आले आहे.

महायुतीचा विजय आणि महाविकास आघाडीचा पराभव हा महाराष्ट्राच्या राजकारणातील नवा टप्पा मानला जात आहे.

हे सुद्धा नक्की वाचा:- Tata च्या कर्व SUV ची तुफान मागणी! फक्त ₹10 लाखांपासून सुरू, वेटिंग पिरियड तीन महिन्यांपर्यंत वाढला |Tata Curvv price