WhatsApp New Features- WhatsApp जगभरात लोकप्रिय असणारा इन्स्टंट मेसेजिंग अॅप आहे. फॅमिली, मित्रमंडळी, तसेच ऑफिसच्या कामासाठी लोकांनी WhatsApp ला दैनंदिन संवादाचं महत्त्वाचं साधन बनवलं आहे. युजर्सना उत्तम अनुभव देण्यासाठी WhatsApp सतत नवीन फीचर्स लाँच करत असतं. आता WhatsApp ने एक नवीन आणि अत्यंत उपयुक्त फीचर आणण्याची तयारी केली आहे ज्यामुळे युजर्स अगदी सहजपणे आपले कॉन्टॅक्ट्स मॅनेज करू शकतात, तेही मोबाईल न वापरता!
हे नवं फीचर कसं काम करणार?
WhatsApp च्या नवीन अपडेटमध्ये युजर्सना “कॉन्कॅक्ट मॅनेजर” फीचर मिळणार आहे, ज्यामुळे युजर्स कोणत्याही डिव्हाईसवरून, जसं की डेस्कटॉप किंवा लिंक केलेलं अन्य डिव्हाईस, त्यांचे कॉन्टॅक्ट्स सहज मॅनेज करू शकतील. यासाठी मोबाईल फोनवरून लॉग इन करण्याची किंवा ते सतत बरोबर ठेवण्याची गरज भासणार नाही.
Meta च्या मते, हे फीचर आधी WhatsApp वेब आणि विंडोज प्लॅटफॉर्मसाठी लाँच होईल. यामुळे तुम्हाला डेस्कटॉपवरूनच नवीन कॉन्टॅक्ट्स सेव्ह करण्याची, एडिट करण्याची आणि मॅनेज करण्याची सुविधा मिळेल.
WABetaInfo कडून फीचरबद्दलची माहिती
WABetaInfo या WhatsApp फीचर्स ट्रॅक करणाऱ्या लोकप्रिय वेबसाइटने या नवीन फीचरबाबत माहिती दिली आहे. त्यांनी या फीचरचे स्क्रीनशॉट देखील शेअर केले आहेत, ज्यातून दिसतं की, युजर्स आता कोणत्याही वेळी, कोणत्याही लिंक केलेल्या डिव्हाईसवरून WhatsApp कॉन्टॅक्ट्सवर अॅक्सेस मिळवू शकतील.
युजर्सना होणार फायदा
WhatsApp New Features या आधी अनेक युजर्सना कॉन्टॅक्टसाठी फोनच्या संपर्क क्रमांकावर अवलंबून राहावं लागायचं. जर फोनमधून कॉन्टॅक्ट डिलीट केला तर तो कॉन्टॅक्ट WhatsApp वरूनही हटायचा. आता मात्र, कॉन्टॅक्ट मॅनेजर फीचरमुळे एकदा सेव्ह केलेले कॉन्टॅक्ट्स आपल्या अन्य लिंक केलेल्या डिव्हाईसवरदेखील अॅक्सेसिबल असतील.
यामुळे कॉन्टॅक्ट मॅनेजमेंट आणखी सोपं होईल आणि युजर्सचा चॅटिंग अनुभव सुलभ आणि अधिक चांगला बनेल.
WhatsApp च्या या नवीन फीचरमुळे युजर्सना त्यांचे कॉन्टॅक्ट्स अधिक सोप्या पद्धतीने, मोबाईलच्या गरजेशिवाय मॅनेज करण्याची सुविधा मिळणार आहे. Meta ने युजर्सच्या अनुभवाला महत्त्व दिलं असून अशा नव्या सुधारणा आणल्यामुळे WhatsApp ला जगभरात आणखी लोकप्रियता मिळेल.
WhatsApp च्या या नवीन फीचरची उत्सुकतेने वाट पाहत असलेल्या युजर्ससाठी हा नक्कीच एक मोठा बदल ठरेल.
ही सुद्धा नक्की वाचा:- एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व्ह! प्रवाशांना फोनचवरच मिळणार ‘एसटी’ बसची सगळी माहिती; लगेच पहा व्हाटसप नंबर..! |MSRTC Bus updates