📰 भारतीय स्टेट बँक आरसेटी, बीडमध्ये विविध प्रशिक्षणांसाठी प्रवेश सुरू! 🙌
ग्रामीण युवक-युवतींसाठी मोफत प्रशिक्षण संधी 🚀
Mofat Shilai Machine Training भारतीय स्टेट बँक ग्रामीण स्वयं रोजगार प्रशिक्षण संस्था (आरसेटी), बीड येथे 18 ते 45 वयोगटातील ग्रामीण भागातील युवक-युवतींसाठी विविध कौशल्य आधारित मोफत प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करण्यात आले आहेत. या प्रशिक्षणांमध्ये सहभागी होऊन रोजगारक्षम बनण्याची सुवर्णसंधी आहे.
Mofat Shilai Machine Training– प्रशिक्षणाचे मुख्य आकर्षण 🌟
- सर्व प्रशिक्षण मोफत 💯
- राहण्याची आणि भोजनाची विनामूल्य सोय 🍛
- प्रशिक्षणासाठी लागणारे साहित्य विनामूल्य ✂️📏
- प्रेरणादायी आणि प्रॅक्टिकल आधारित प्रशिक्षण 🛠️
- दैनंदिन गरजांच्या वस्तूंची मोफत उपलब्धता 🎁
- बँकिंगचे संपूर्ण ज्ञान व व्यावसायिक मार्गदर्शन 💼
पुढील प्रायोजित प्रशिक्षण 👗✂️
वुमेन्स टेलर, शिवणकाम प्रशिक्षण महिलांसाठी (30 दिवस):
📅 01 जानेवारी 2025 ते 30 जानेवारी 2025
अटी व शर्ती 📝
- ग्रामीण भागातील रहिवाशी असणे आवश्यक.
- वय: 18 ते 45 वर्षे.
- महिला बचत गट आणि मनरेगा जॉबकार्ड धारकांना प्राधान्य.
- दारिद्रय रेषेखालील व्यक्तींना प्राधान्य.
फॉर्म भरण्यासाठी लिंक:
https://forms.gle/e3FEbGQfVcRGPKX29
📌 ऑफिसवरून फोन आल्यानंतरच प्रशिक्षणासाठी यावे.
संपर्कासाठी 🕵️
- सुरेश बोचकुरे: 📞 9764677968
वरील क्रमांकावर फक्त बीड जिल्ह्यातील नागरिकांनीच कॉल करावा. इतर जिल्ह्यातील नागरिकांनी तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी असणाऱ्या RSETI कार्यालयाशी संपर्क साधावा.
पत्ता:
भारतीय स्टेट बँक, ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था (आरसेटी),
SP ऑफिस समोर, SBI शिवाजीनगर शाखा, दुसरा मजला,
बीड – 431122.
👉🏻 नावनोंदणीसाठी उपलब्ध ठिकाण:
MSRLM, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान,
तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष, सर्व तालुके, जिल्हा बीड.
🙏 सामाजिक कार्यात आपले योगदान द्या आणि ही माहिती गरजूंना पोहोचवा!
हे सुद्धा नक्की वाचा:- रब्बी ई-पीक पाहणी ची प्रक्रिया बदलली ; DCS – App द्वारे करा पीक पहाणी लगेच; शेवटची तारीख इथे पहा | rabbi e pik pahani last date