PMC Bharti 2024 पुणे महानगरपालिकेमध्ये फक्त मुलाखतीद्वारे नवीन रिक्त पद भरती सुरू, पगार तब्बल 80 हजार रुपये मिळेल.

Pune Mahanagar Palika Bharti 2024 नमस्कार मित्रांनो आपल्या विद्यार्थी मित्रांसाठी पुणे महानगरपालिका अंतर्गत जी रिक्त पद भरती प्रक्रिया निघालेली आहे या रिक्त पद भरती प्रक्रियेची माहिती आज आपण आपल्या या न्यूज पोर्टल वरती घेणार आहोत. मित्रांनो पुणे महानगरपालिका वैद्यकीय शिक्षण ट्रस्टचे भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय पुणे यांच्या अंतर्गत प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, वरिष्ठ निवासी, सहाय्यक प्राध्यापक, कनिष्ठ निवासी या आणि इतर काही रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांनी थेट मुलाखतीसाठी दिलेल्या पत्त्यावर हजर राहायचे आहे.

 

अधिकृत जाहिरात 👉 इथे क्लिक करा

 

अधिकृत संकेतस्थळ 👉 इथे क्लिक करा

 

वय मर्यादा ✍️ – 
1) प्राध्यापक – खुल्या प्रवर्गासाठी जास्तीत जास्त 50 वर्षे ते मागासवर्गीय प्रवर्गासाठी 55 वर्षे.
2) सहयोगी प्राध्यापक – खुल्या प्रवर्गासाठी 45 वर्षे ते जास्तीत जास्त 50 वर्षे.
3) वरिष्ठ निवासी – 45 वर्षे
4) सहाय्यक प्राध्यापक – खुल्या प्रवर्गासाठी 40 वर्षे तसेच मागासवर्गीय प्रवर्गासाठी 45 वर्षे.
5) कनिष्ठ निवासी – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 38 वर्षे आणि मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी 43 वर्ष.

 

मित्रांनो वरील दिलेल्या पदांसाठी शैक्षणिक पात्रता तुम्हाला पाहिजे असल्यास वरती दिलेल्या अधिकृत जाहिरात या लिंक वर क्लिक करून अधिकृत जाहिरात डाऊनलोड करून तुम्ही स्वतः पाहून घ्यावी जेणेकरून तुम्हाला भरती विषयक सविस्तर माहिती मिळणार आहे. तर मित्रांनो दिलेल्या पदांसाठी कोणतीही परीक्षा होणार नसून थेट मुलाखत आयोजित करण्यात आली आहे आणि खाली मुलाखतीचा पत्ता सुद्धा आम्ही दिलेला आहे. इच्छुकांनी पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे आणि मुलाखतीची तारीख 7, 12, 21 आणि 26 मार्च 2024 पर्यंत आहे. दिलेल्या तारखेला आणि दिलेल्या कालावधीच्या आत मध्ये मुलाखतीसाठी उमेदवारांनी हजर राहायचे आहे.

 

मुलाखतीचा पत्ता ✍️ – भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, मंगळवार पेठ पुणे – 411011