Technology हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञान एका गुंठ्यात वीस गाईचा चारा तयार करा तोही कमी पाण्यात

नमस्कार मित्रांनो आज आपण आपले न्यूज पोर्टलवर एक नवीन तंत्रज्ञान चा गुरांसाठी चारा पाहणार आहोत.

चला तर मग जाणून घेऊया काय आहे ते तंत्रज्ञान कमी पर्जन्यमानामुळे चारा उत्पादनात लक्षणीय घट झाली आहे.

तसेच, कमी पावसामुळे पिकाची वाढ खुंटल्यामुळे हिरवा चाऱ्याची टंचाई निर्माण झाली आहे.

पारंपरिक पद्धतीपेक्षा हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञानाच्या साहाय्याने जनावरांसाठी कमी वेळेत सकस चारा उपलब्ध होऊ शकतो.

बदलते हवामान आणि पाण्याची कमतरता यामुळे जनावरांना १२ महिने दर्जेदार चारा उपलब्ध करून देणे ही समस्या ठरू लागली आहे.

👇👇अशाच नवनवीन बातम्या आपल्या मोबाईलवर मोफत वाचण्यासाठी आमच्या शेतकरी ग्रुपमध्ये सामील व्हा 👆 👆

 Technology हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञानामुळे हे शक्य आहे 

या तंत्राने चारा तयार केल्यास खर्च आणि वेळ दोन्ही गोष्टी नियंत्रणात राहतात.

हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञान हायड्रोपोनिक्स तंत्राद्वारे चारा उत्पादन म्हणजे कोणत्याही माध्यमाशिवाय चारा उपलब्ध करता येतो.

कमीत कमी पाण्यामध्ये व कमीत कमी क्षेत्रावर नियंत्रित वातावरणात मका, गहू या बियाण्यापासून २० ते २५ से.मी.उंचीचा चारा उत्पादन करणे होय. २० ते २५ से.मी. पीक अवस्था असताना चारा मुळासकट जनावरांना देता येतो. हायड्रोपोनिक्स चारा तयार करण्याची पद्धत

चारा उत्पादन तंत्रज्ञान

चारा उत्पादनासाठी मका हे सर्वात योग्य पीक आहे.

प्रथम मकाचे बियाणे घ्यावे त्यातील इतर कडीकचरा, फुटलेले बियाणे काढून टाकावे.

बियाणाची उगवण क्षमता चांगली असावी. ८५ टक्के पेक्षा कमी उगवणक्षमता नसावी.

निवडलेले बियाणे मोजून भांड्यात पाणी घेवून त्यात भिजत ठेवावे. पाण्यावर तरंगणारे बियाणे कढून टाकावे.

साधारणतः १२ तास बियाणे पाण्यात ठेवावे. १२ तासानंतर बियाणे पाण्यातून काढून आले पोते किंवा गोणीमध्ये गुंडाळून मोड येण्यासाठी अंधा-या ठिकाणी ठेवावे.

दोन ते तीन दिवसात बियाण्यात मोड येतात. या दरम्यान गोणीची ओल कमी झाल्यास त्यावर हलके पाणी शिंपडावे म्हणजे योग्य आर्द्रता राहून मोड लवकर येतील.

मोड आलेले बियाणे शेडनेटमध्ये चारा उत्पादनासाठी वापरावे.

हेही वाचा 👇👇

👉खुशखबर नवीन वर्षात केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणार पगार वाढ👈

मोड आलेले बियाणे वाढीसाठी प्लॅस्टीक ट्रे मध्ये पसरून ठेवावे. यासाठी प्रथम प्लॅस्टीक ट्रे क्लोरीनच्या पाण्याने पुसुण निर्जतुक करून घ्यावेत.

प्लॅस्टीक ट्रे खालील बाजूस जाळीदार असल्यास त्यात ठराविक अंतरावर छिद्रे पाडलेला प्लॅस्टीक कागद पसरावा.

प्लॅस्टीक कागदसुध्दा क्लोरीनच्या पाण्योन निर्जतूक करावा. ट्रे मध्ये मोड आलेले बियाणे पसरावे, बियाणे पसरवताना एकसारखे पसरावे.

अधिक बियाणे कमी जागेत पसरू नये अन्यथा बियाणे एकावर एक पसरले जातात.

यामुळे उमवण व वाढ व्यवस्थीत होत नाही. यासाठी साधारणतः ३५० ग्रॅम मका बियाणे प्रति चौ. फूट या प्रमाणत वापरल्यास त्याचे प्रमाण कमी किंवा अधिक होता एकसारखे पसरले जाते. बियाणे पसरविल्यानंतर ट्रे मांडणीवर ठेवावेत.

बियाण्याची उमवण व्यवस्थित मोड आल्यानंतर ट्रे मध्ये टाकावेत. तसेच मोड आलेले बियाणे जास्त हाताळू नयेत.

शेडनेटमधील तापमान १५ ते २५ अंश सेंग्रे. दरम्यान आणि आर्द्रता ५० ते ८० टक्के ठेवावी म्हणजे बियाण्याची उगवण चांगली होते.

पाणी व्यवस्थापनबियाणे प्लॅस्टीक ट्रे मध्ये ठेवल्यानंतर दररोज ठराविक अंतराने त्यास पाणी फवारणे गरजेचे आहे.

पाणी फवारतांना जेट किंवा फॉगर्सच्या सहाय्याने फवारावे किंवा फवारणी पंप, हातपंपाच्या सहाय्याने ट्रेमधील बियाण्यावर पाणी फवारावे.

पाणी फवारणीचा कालावधी आणि प्रमाण योग्य असावे.

पाण्याचे प्रमाण अधिक झाल्यास पीक सडण्याची शक्यता असते तसेच पाणी कमी झाल्यास पीकाची वाढ खुंटते तसेच पीक जळू शकते.

पाणी फवारणीची वेळ ही प्रामुख्याने हावामानावर अवलंबून असते. पावसाळा, हिवाळयात दर दोन तासांनी २ मिनीटे पाणी फवारावे तर उन्हाळयात दर तासाने २ मिनीटे पाणी फवारावे.

हे ही पाहा 👇👇

👉लोकसभा निवडणूका अगोदर मोदी सरकारचा मास्टर स्ट्रोक या 👈

पाणी फवारल्यास पीकाची वाढ चांगल्या प्रकारे होते. पाण्याची फवारणी फक्त दिवसा करावी.

पाण्यामूळे पीक वाढीसाठी आवश्यक असणारा ओलावा व आर्द्रता ठेवता येते.

ट्रे शेडमध्ये ठेवल्यानंतर साधाणतः १० ते १२ दिवसांत पिकांची उंची २५ ते ३० सेमी होते तसेच ट्रे मध्ये मुळांची घट्ट गादी ८ ते १० सेमी जाडीची तयार होते.

पीकाची वाढ झाल्यानंतरही अधिक दिवस शेडनेटमध्ये ठेवलयास त्यात पाणी साचून ते कुजण्याची प्रक्रिया सुरू होते. तसेच त्याची वाढही मंदावते. त्यामूळे २५ ते ३० सेमी उंची झाल्यानंतर चाऱ्यासाठी वापरावे.

मका पिकाची साधारणः १२ दिवसात वाढ पुर्ण होते.

वापरचाऱ्याची वाढ पुर्ण झाल्यानंतर ट्रे मधील चाऱ्याची मॅट काढून बारीक तुकडे करून जनावरास खाऊ घालावेत.

चारा हा लुसलुसीत, कोवळा असल्याने मुळांसह चारा जनावरे आवडीने खातात.

एका गाईला दररोज १२ ते १५ किलो हिरवा चारा खाऊ घालावा. हा चारा इतर हिरव्या किंवा वाळलेल्या चा-यासोबत एकत्र करूनही खाऊ घालता येतो.

चारा शेडनेटच्या बाहेरही आल्यानंतर ४८ तासाच्या आत जनावरास खाऊ घालावा.

चारा काढलयानंतर प्लॅस्टीक ट्रे धुवुन निर्जतुक करून पुन्हा चारा उत्पादनासाठी

वापरावा.