Black budget स्वातंत्र्य भारताचे पहिले ब्लॅक बजेट कोणी केले सादर आणि ते कोणत्या वर्षी झाले सादर

नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या न्यूज पोर्टलवर एक ऐतिहासिक बातमी पाहणार आहोत.

चला तर मग जाणून घेऊया काय ऐतिहासिक आहे तर

दरवर्षी आपल्या देशाची एक फेब्रुवारीला आर्थिक बजेट सादर होते.

आपल्या देशाचे पहिले बजेट 26 नोव्हेंबर 1947 रोजी भारताचा पहिला अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता.

या प्रत्येक अर्थसंकल्पाने राष्ट्र म्हणून भारताला घडवले आहे. त्यातील अनेक तरतुदींनी आर्थिकदृष्ट्या भारताला सक्षम केले आहे.

👇👇अशाच नवनवीन बातम्या आपल्या मोबाईलवर मोफत वाचण्यासाठी आमच्या शेतकरी ग्रुपमध्ये सामील व्हा 👆👆

चला तर मग आज आपण अर्थसंकल्पाशी संबंधित महत्वाच्या ऐतिहासिक घटना

ब्लॅक बजेट’ कधी मांडले गेले Black budget

1973-74 च्या अर्थसंकल्पाची गोष्ट आहे. 1971 मध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध झाले.

त्यावेळी देशाची स्थिती अत्यंत वाईट होती देश आर्थिक संकटाचा सामना करत होता.

तसेच खराब मान्सूनमुळे देशात दुष्काळ पडला होता.

त्यावेळी देशात इंदिरा गांधींचे सरकार होते.                      या परिस्थितीमुळे सरकारचा खर्च त्याच्या उत्पन्नापेक्षा जास्त झाला होता आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला होता.

तेव्हा तत्कालीन अर्थमंत्री यशवंतराव बी.चव्हाण यांनी देशाचा ‘काळा अर्थसंकल्प’ मांडावा लागला.

अर्थमंत्र्यांनी याला ‘ब्लॅक बजेट’ म्हटले होते :

1973-74 च्या या अर्थसंकल्पात 550 कोटी रुपयांची तूट होती.

हे ही वाचा 👇👇 

👉खुशखबर नवीन वर्षात केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणार पगार वाढ👈

 

त्यावेळी तत्कालीन अर्थमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात देशात दुष्काळामुळे निर्माण झालेली परिस्थिती आणि अन्नधान्य उत्पादनात मोठी घट झाल्यामुळे अर्थसंकल्पीय तूट वाढल्याचे सांगितले होते.

त्यामुळेच ‘ब्लॅक बजेट’ सादर करण्याची परिस्थिती निर्माण झाली होती.

तेव्हापासून हा अर्थसंकल्प ‘ब्लॅक बजेट’ म्हणून ओळखला जाऊ लागला.

आजपर्यंत स्वतंत्र भारतात ‘ब्लॅक बजेट’ एकदाच सादर करण्यात आले आहे.

इंदिरा गांधी सरकारने कोळसा खाणींचे राष्ट्रीयीकरण केले होते.                                                                         वर्ष 1973 मध्ये इंदिरा गांधींच्या सरकारने अनेक मोठे आर्थिक निर्णय घेतले.

त्यांनी कोळसा खाणींचे राष्ट्रीयीकरण केले. त्यासाठी 56 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती.

कोळसा खाणींच्या राष्ट्रीयीकरणामुळे सरकारचे नुकसान झाले.

तेव्हा सरकारचे आर्थिक नुकसान 550 कोटी रुपयांपर्यंत वाढले होते.

शेवटी सरकारला ब्लॅक बजेट मांडण्याचा निर्णय घ्यावा लागला. ब्लॅक बजेटमध्ये सरकार आपला खर्च कमी करते.

हे ही वाचा 👇👇

 👉हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञानाची एका गुंठ्यात वीस गाईचा चारा तयार करा तो ही कमी पाण्यात👈

‘ब्लॅक बजेट’ म्हणजे काय?

जेव्हा सरकारचा खर्च त्याच्या उत्पन्नापेक्षा जास्त असतो तेव्हा सरकारला बजेटमध्ये कपात करावी लागते. अशा अर्थसंकल्पाला ‘ब्लॅक बजेट’ म्हणतात.

समजा सरकारची कमाई 200 रुपये आहे आणि त्याचा खर्च 250 रुपये आहे, तर ही तूट भरून काढण्यासाठी सरकार आपल्या बजेटमध्ये अनेक कपात करते.

अशा अर्थसंकल्पाला ‘ब्लॅक बजेट’ म्हणतात.