Land Record Registration मोबाईलवर फक्त 2 मिनिटात करता येणार वारस नोंदणी, ७/१२ उताऱ्यावर अशा पद्धतीने लावा नाव.

सातबारा उतारावर वारस नोंद करण्याची पद्धत खालील प्रमाणे आहे. Land Record Registration

 

मित्रांनो तुम्हाला सर्वात अगोदर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून अधिकृत संकेतस्थळ महाभुमीच्या वेबसाईटवर तुम्हाला जायचं आहे. आणि तुम्हाला apply online for mutation या पर्यायावर क्लिक करायचं.

आता त्यानंतर तुमच्यासमोर एक पुढील पेज ओपन होणार आहे. आता सर्वात अगोदर तुम्हाला प्रथमतः तुमची नवीन नोंदणी करून घ्यायची आहे.

त्यानंतर आपल्याला लॉगिन करायचे आहे. आपण लॉग इन केल्यानंतर आपल्यासमोर या संकेतस्थळावर साहेब ऑप्शन्स येणार आहेत. यामध्ये आपल्याला 7/12 mutations पर्यायावर क्लिक करायचे आहे

आता पुढे एक नवीन पेज ओपन होणार आहे तिथे तुमचा जिल्हा आणि तालुका तसेच गाव जे आहे ते सिलेक्ट करून पुढे चालू ठेवायचे आहे.

त्यानंतर पुढील पेजवर काही नवीन ऑप्शन्स आपल्याला दिसणार आहेत त्यापैकी आपल्याला वारस नोंद या पर्यायावर क्लिक करून पुढे चालायचे आहे.

आता आपल्यासमोर संकेतस्थळावरील एक अर्ज ओपन होणार आहे तो अर्ज आपल्याला व्यवस्थित भरून सबमिट करायचा आहे.

अर्ज व्यवस्थित पद्धतीने भरल्यानंतर आपल्याला जी आवश्यक कागदपत्रे आहेत ती ऑनलाईन पद्धतीने अपलोड करावी लागणार आहेत.

आणि सर्वात शेवटी आपल्याला सबमिट या पर्यायावर क्लिक करून हा फॉर्म व्यवस्थित भरून टाकावा लागणार आहे.

 

तर शेतकरी बांधवांना अशाप्रकारे आपण घरबसल्या ऑनलाइन पद्धतीने सातबारा उताऱ्यावर वारस नोंदणी करू शकतो. तर तुम्हालाही वारस नोंदणी करायची असल्यास खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून ऑनलाईन वारस नोंदणी तुम्ही पण करू शकता.

 

 

७/१२ उताऱ्यावर ऑनलाइन पद्धतीने वारस नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा.