Land Rate in Maharashtra अरे बापरे..! आता फक्त दोनच मिनिटात तुमच्या जमिनीचे सरकारी भाव पहा अशा पद्धतीने.

Land valuation नमस्कार शेतकरी बांधवांनो आम्ही तुमच्यासाठी एक चांगली आणि मोठी अपडेट घेऊन आलो आहोत. शेतकरी बांधवांनो आज आपण आपल्या पोस्टमध्ये पाहणार आहोत की घरबसल्या आपण आपल्या जमिनीचे सरकारी भाव म्हणजेच व्हॅल्युएशन कशा पद्धतीने काढायची हे आज आपण या पोस्ट मधून शिकणार आहोत. म्हणजे थोडक्यात सांगायचे शेतकरी बांधवांनो की आपल्याला व्हॅल्युएशन काढायचे असेल किंवा जमिनीचे शासकीय भाव पाहायचे असेल तर रजिस्ट्री ऑफिसला जावे लागते. पण आता या पद्धतीत बदल झालेला असून आता एका ऑनलाईन वेबसाईट द्वारे सुद्धा आपण घरी बसल्या बसल्या आपल्या जमिनीचे सरकारी भाव पाहू शकतो.

 

मित्रांनो हे भाव म्हणजेच आपल्या जमिनीची व्हॅल्युएशन कसे पाहायचे आपल्याला आपल्या जमिनीचे खरेदी किंवा व्यवहार विक्री व्यवहार करायचा असेल तर सगळ्यात अगोदर आपल्याला जमिनीचे व्हॅल्युएशन काढणे खूप महत्त्वाचे असते. आणि तेही शासकीय दर पत्रकाप्रमाणे काय आज आपल्या जमिनीच्या दर आहे ते कसे पाहायचे आज या पोस्टमध्ये आपण पाहून घेऊ.

 

 

 

👉हे पण वाचा, कापूस बाजार भावाने आज गाठला नवीन उच्चांक, लगेच पहा आजचे नवीन दर.👈

 

 

 

मित्रांनो आपल्या जमिनीचे दर हे आपल्याला माहिती असणे खूपच गरजेचे आहे आणि आपण आपल्या जमिनीच्या किमतीचा विचार जर केला तर गावाप्रमाणे किंवा जिल्ह्याप्रमाणे देखील या किमती आजकाल दररोज बदलायला लागले आहेत. शेतकऱ्यांना आपल्याला जर आपल्या जमिनीवर बँकेकडून प्रायव्हेट लोन जर काढायचे असेल तरी देखील या व्हॅल्युएशन नुसारच आपल्याला बँक लोन (Bank Loan) देत असते. तर आपल्या जमिनीचे जर व्हॅल्युएशन वीस लाख रुपये निघाले तर आपल्याला कमीत कमी पाच ते सहा लाख रुपये आरामशीर बँक लोन भेटते. त्यामुळे आपल्या जमिनीचे शासकीय दर पत्रकानुसार भाव काय आहेत हे पाहणे खूप गरजेचे आहे.

 

आणि अशातच आता शासनाचे नवनवीन प्रोजेक्ट म्हणजेच प्रकल्प सुरू असताना जसे की आपण थोडक्यात माहिती घेऊ रेल्वे किंवा महामार्ग तसेच विविध जलसिंचन शासकीय प्रोजेक्ट असे मोठ्या प्रमाणावर सुरू असून यामध्ये बऱ्याचशा शेतकरी मित्रांच्या जमिनी या जात आहेत पण त्यांना व्हॅल्युएशन (Land Valuation) प्रमाणे पैसे देखील मिळत आहेत.

 

 

शासकीय दर पत्रकानुसार जमिनीचे भाव कसे पाहायचे ?

शेतकरी मित्रांनो एकदम सोप्या पद्धतीने आपण शासकीय दर पत्रकानुसार आपण आपल्या जमिनीचे भाव पाहू शकतो. त्यासाठी खाली एक लिंक दिली आहे त्या लिंक वर तुम्हाला सर्वप्रथम भेट द्यावी लागणार आहे. आणि ही वेबसाईट ओपन झाल्यानंतर तुम्हाला एक पेज या ठिकाणी ओपन होईल पुढे मुद्रांक या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि मूल्यांकन परिवर्तन या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचे आहे त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर व्हेरिफिकेशन होईल आणि पुढे तुम्हाला तुमच्या जमिनीचे भाव अगदी सहज पद्धतीने पाहायला मिळतील. आणि मित्रांनो या वेबसाईटवर तुम्हाला तुमच्या जमिनीचे गट नंबर इतर माहितीही टाकावी लागणार आहे नंतर मोबाईल नंबर व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुम्हाला जमिनीचे सरकारी दर पत्रकानुसार भाव हे पाहायला मिळणार आहेत. तर मित्रांनो खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही जमिनीचे शासकीय भाव पाहू शकता.

 

 

 

👇👇👇👇👇👇

तुमच्या जमिनीचे सरकारी दरपत्रकानुसार आजचे भाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

3 thoughts on “Land Rate in Maharashtra अरे बापरे..! आता फक्त दोनच मिनिटात तुमच्या जमिनीचे सरकारी भाव पहा अशा पद्धतीने.”

Leave a Comment