Nuksan bharpai Government GR नुकसान भरपाई तुम्हाला पाहिजे असेल तर आता अशा प्रकारे करावा लागेल तुम्हाला अर्ज.

Nuksan bharpai Government GR नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या पोस्टमध्ये आपल्या शेतकरी मित्रांसाठी चांगली आणि मोठी अपडेट घेऊन आलेलो आहोत. आणि ही अपडेट नक्कीच आपल्या शेतकरी मित्रांच्या कामाला येणार आहे कारण की आता तुम्हाला जर नुकसान भरपाई हवी असेल तर फक्त पिक विमा भरून आणि ए पीक पाहणी यापूर्वी तक्रार करून नाहीतर हा फॉर्म भरून तुम्हाला द्यावा लागेल तरच तुम्हाला नुकसान भरपाई मिळणार आहे. तर हे काय नवीन भानगड आहे आणि हा अर्ज कशाप्रकारे आणि कुठे करावा लागेल आणि अर्ज कुठून डाऊनलोड करावा लागेल हे आज आम्ही तुम्हाला या पोस्टमध्ये सांगणार आहोत.

 

 

 

👇👇👇👇👇👇

नुकसान भरपाई नवीन अर्जाचा नमूना डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

 

 

मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये वेळोवेळी वेगवेगळ्या प्रकारच्या नैसर्गिक संकटांमुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे तसेच पशुधनांचे आणि त्यांच्या घरांचे सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये या नुकसानग्रस्त झालेल्या शेतकरी बांधवांना तात्काळ नुकसान भरपाई मिळणे हे खूप आवश्यक आहे. आणि या शेतकरी बांधवांना नुकसानारपण मिळवून देण्यासाठी राज्य सरकारने एक महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय जाहीर केलेला असून तो आज आपण या पोस्टमध्ये पाहणार आहोत. तसेच जो अर्जाचा नमुना दिलेला आहे खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्हाला अर्जाचा नमुना डाऊनलोड करायचा आहे आणि तो डाउनलोड करून कुठे भरून द्यायचा आहे ते आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

 

मित्रांनो अतिवृष्टी नुकसान भरपाई झालेली असेल तर अशा प्रकारचे नुकसान झालेले त्या ठिकाणचे पंचनामे झाल्यानंतर शेतकऱ्यांना मदत मिळत असते आणि बऱ्याच वेळा असे झालेले आहेत. पण आता काही वेगळ्या प्रकारे शासनाने नियम ठरवून आता एक तुम्हाला नवीन फॉर्म भरून तलाठ्याकडे द्यावे लागणार आहे आणि तरच तुम्हाला ही नुकसान भरपाई मिळणार आहे. तलाठ्या कडे हा फॉर्म भरून देताना कोणती कागदपत्रे द्यावे लागतील ते खालील प्रमाणे.

 

तलाठ्याकडे फॉर्म सोबत ही द्यावी लागणार कागदपत्रे.

जमिनीचा सातबारा तलठ्याकडील

8 आ चा उतारा

आधार कार्ड झेरॉक्स

बँक पासबुक झेरॉक्स

ही सर्व कागदपत्रे घेऊन तुम्हाला हा फॉर्म तलाठी कडे देताना द्यावी लागेल आणि जमिनीचा जो सातबारा आहे तो डिजिटल न घेता तलाठ्याकडूनच घ्यावा लागेल. त्यामुळे तुम्ही तलाठ्याकडून सातबारा घेऊन त्यांच्याकडे हा तुम्ही फॉर्म सुपूर्द करू शकता.

 

 

 

👇👇👇👇👇👇

नुकसान भरपाई नवीन अर्जाचा नमूना डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

 

तर शेतकरी बांधवांनो अशाप्रकारे हा अर्जाचा नमुना तुम्ही तलाठी कडे दिल्यानंतर ऑनलाईन पद्धतीने याची सर्व चौकशी होऊन तुमच्या खात्यामध्ये जो बँक पासबुक झेरॉक्स प्रत तुम्ही दिलेली आहे त्यामध्ये काही दिवसात तुमच्या खात्यामध्ये नुकसान भरपाईची रक्कम शासनाकडून मंजूर करण्यात आलेली आहे ती तुमच्या खात्यामध्ये हस्तांतरित करण्यात येईल. शेतकरी बांधवांनो माहिती आवडली असेल तर इतर शेतकरी बांधवांना शेअर करा..

Leave a Comment