Solar Power Project सौर ऊर्जेच्या प्रोजेक्टसाठी शेती द्या भाड्याने आणि वर्षाला कमवा तब्बल 75 हजार रुपये.

Mukhyamantri Saur Krishi Vahini Yojana नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या पोस्टमध्ये सौर ऊर्जेचा प्रोजेक्ट आहे याविषयी बोलणार आहोत. मित्रांनो आपल्या शेतकरी बांधवांसाठी एक लाभदायक आणि शासनाकडून सुरू असलेली सौर ऊर्जा प्रोजेक्टसाठी शेती भाड्याने देण्याची योजना सुरू असून तुम्ही जर यामध्ये तुमची शेती भाड्याने दिली तर वर्षाकाठी तुम्हाला जवळपास 75 हजार रुपये फक्त भाडे तत्त्वावर मिळणार आहेत. आणि मित्रांनो ही योजना सध्या सुरू असल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा देणारी ही एक बातमी असून यामधून शेतकरी बांधवांना लाईट देखील दिवसाला बारा तास मिळणारच आहे या हेतूने ही योजना सध्या सुरू करण्यात आलेली आहे. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना मार्फत योजना राबवली जात असून यासाठी लागणारी जी जागा आहे आणि जी कोणी शेतकऱ्यांनी ती जागा दिलेल्या आहेत त्यांना भाडे तत्त्वावर मोबदला म्हणून प्रति हेक्टर वार्षिक 75 हजार रुपये इतके भाडे देण्यात येणार आहे.

 

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना शासन निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

 

Solar Power Project for farmers संदर्भातील एक शासन निर्णय सुद्धा जाहीर झालेला असून या योजनेमुळे शेतकऱ्यांना तसेच त्यांना सर्व शेतकरी बांधवांना या योजनेचा फायदा होणार आहे. आणि या योजनेचा जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी लाभ घ्यावा असे आवाहन सरकारकडून करण्यात आली आहे. मित्रांनो सध्याच्या काळामध्ये विजेचा तुटवडा खूप मोठ्या प्रमाणात असल्यामुळे शेती क्षेत्रामध्ये 24 तास 20 पुरवठा करता यावा यासाठी राज्य सरकारने ही योजना सुरू केलेली आहे. आणि या योजनेचे नाव कृषी सौरवाहिनी योजना असून ही योजना सध्या सुरू असून ही योजना जवळपास 2017 पासून शासनाकडून सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेमधून म्हणजेच या प्रोजेक्ट मधून दर दिवशी मेगावॅट वीज निर्मिती होणार आहे. यासाठी जो कोणी शेतकरी जमीन देणार आहे महावितरण त्याला एकरी तीस हजार आणि हेक्टरी 75 हजार रुपये असे वार्षिक मोबदला म्हणजे भाडेतत्त्वावर त्या शेतकरी बांधवांना मिळणार आहे.

 

त्यामुळे ही योजना आपल्या शेतकरी बांधवांसाठी खूपच फायदेशीर ठरणार आहे. सर्व राज्यांमध्ये एकूण वापरापैकी शेती क्षेत्रासाठी 30% विजेचा वापर करण्यात येत असतो त्यामुळे राज्यामधील शेतकऱ्यांसाठी नियमित म्हणजे 24 तास वीज पुरवठा व्हावा यासाठी सरकारने 14 जून 2017 पासून मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी ही योजना सुरू केलेली आहे. या योजनेअंतर्गत होणाऱ्या वीजनिर्मितीमधून शेतकऱ्यांच्या शेतीसाठी दिवसा वीज पुरवठा करणे हे शक्य होणार आहे. आणि यामुळे शेतकऱ्यांना जे रात्री शेतीमध्ये काम करावे लागते ते कमी होणार आहे आणि त्यांना दिवसात सर्व शेतीची कामेही वीज पुरवठा झाल्यामुळे करता येणार आहेत. तर मित्रांनो या योजनेचा लाभ घ्यायचा असल्यास तुम्हाला खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करायचे आहे आणि तिथून पुढे तुम्हाला सर्व पुढील माहिती भेटणार आहे.

 

 

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.