Emergency Alert Service सगळ्यांच्याच मोबाईलवर आला दूरसंचार विभागाकडून आपत्कालीन अलर्ट, नेमका आहे तरी काय.? समजून घेऊयात.

Emergency Alert Service नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या न्यूज पोर्टल वरती एका महत्त्वपूर्ण विषयावर आपल्या विद्यार्थी मित्रांशी चर्चा करणार आहोत आणि मित्रांनो आज आपल्या सर्वच मित्रांना दूरसंचार विभागाकडून महत्त्वपूर्ण आपत्कालीन अलर्ट आलेला आहे. आणि यामुळे बरेचसे मित्र आणि मैत्रिणीचे आहेत ते पूर्णपणे भेदरलेले आहेत. पण मित्रांनो घेण्याचे काहीच कारण नाही आणि हा अलर्ट कशासाठी आलेला आहे.? हा देखील मुद्दा आज आपण जाणून घेणार आहोत. मित्रांनो सर्वच भारतीय नागरिकांच्या मोबाईल मध्ये आज सकाळी अचानकच अलार्म वाजू लागला आणि सर्वच नागरिकांना दूरसंचार विभागाअंतर्गत एक अलर्ट आलेला आहे. हा अलर्ट आणि मेसेज नक्की काय आहे याबाबत लोकांच्या मनात वेगवेगळे संभ्रम निर्माण झालेले आहेत. अनेक नागरिकांना आपला मोबाईल हॅक होतोय की काय.? अशी देखील भीती वाटू लागली आहे. मोबाईलवर देण्यात आला हा संदेश भारत सरकारच्या दूरसंचार विभागाकडून आपत्कालीन अलर्ट सेवेची चाचणी घेण्यासाठी पाठवण्यात आलेला असल्याचे देखील सांगण्यात आलेले आहे. त्यामुळे मित्रांनो यामध्ये भिण्याचे काहीच कारण नाही.

 

सगळ्यांच्याच फोनवर अचानक हा अलर्टचा पॉप-अप मेसेज आला आणि हा मेसेज काय आहे.? व अशा प्रकारची आपत्कालीन संदेश ची चाचणी घेण्यात येणार आहे याची अगोदर पूर्वकल्पना कुणालाच नव्हती. त्यामुळे सर्वच मित्र घाबरण्याचं कारण हेच आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांच्या मनात या अलर्ट बद्दल वेगवेगळी भीती निर्माण झाली तर अनेकांनी हा मेसेज नक्की गौरमेंटचा आहे की नाही.? याची देखील शंका व्यक्त केलेली आहे. केंद्र सरकारच्या माहिती प्रसारण मंत्रालय किंवा पीआयबीन याबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही तसेच ऑफिशियल ट्विटर हँडल वरही याबाबत कुठलीही माहिती किंवा याबद्दल काही मेसेज सांगण्यात आलेला नाही. सकाळी दहा वाजता सर्वच नागरिकांचा फोन वाजू लागला आणि अनेकांच्या चालू मोबाईल मध्ये पोप अप मेसेज आला. यामध्ये हा संदेश भारत सरकारच्या दूरसंचार विभागाच्या आपत्कालीन सेवेचा एक भाग आहे असे देखील सांगण्यात आलेले आहे. आपत्कालीन संदेशातील ओके बटनावर तुम्ही क्लिक केल्यास तुम्हाला आपत्कालीन अलर्ट सुरू ठेवायचे आहेत की नाही याबद्दल विचारण्यात येत आहे. त्यासाठी हो किंवा नाही असे दोन प्रकारचे पर्याय देखील देण्यात आलेले आहेत. तर मित्रांनो सर्व नागरिकांना मेसेज व्हाईस स्वरूपात देखील आलेला असून हा मेसेज फक्त अँड्रॉइड मोबाईल वापर करताना आलेला असून एप्पल आयफोन वापरकर्त्यांना हा मेसेज आलेला नाही. तर मित्रांनो हा मेसेज दूरसंचार विभागाकडून आपत्कालीन सेवा ची चाचणी घेण्यासाठी आलेला असून यामध्ये कसलीही भीतीचे कारण नाही.