Gopinath Munde Insurance Scheme “ही” विमा योजना बंद; डायरेक्ट शेतकऱ्यांना अनुदान म्हणून 2 लाख रुपये मिळणार; पूर्ण माहीती पहा

Gopinath Munde Insurance Scheme नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र मध्ये डिसेंबर 2019 पासून गोपीनाथराव मुंडे शेतकरी अपघात विमा योजना ही लागू झालेली आहे. सदरील योजना आता सध्या बंद झालेली असून या योजनेमध्ये काही बदल झालेला आहे. तरीही नवीन स्वरूपाने कशाप्रकारे योजना चालू झालेली आहे..? तर आपण या ठिकाणी या बातमीमध्ये बघणार आहोत.  तर गोपीनाथराव मुंडे शेतकरी अपघात विमा योजना ही नव्या पद्धतीने “गोपीनाथराव मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना” या नावाने जाहिर करण्यात आलेली आहे.
तरी या योजनेच्या संदर्भातील नवीन शासकीय जीआर आलेला आहे आणि काही नियम अटी अनुसार शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास कुटुंबीयास दोन लाख रुपयाचा आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे. तरी या संदर्भातील अधिकृत शासन निर्णय पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

 

 

Gopinath Munde Insurance Scheme

गोपीनाथराव मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेचा अधिकृत जीआर पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

 

Gopinath Munde Insurance Scheme गोपीनाथराव मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेमध्ये कंपनीकडून दावे वेळेवर निकाली न काढल्यामुळे म्हणजेच ज्या कंपनीला हे कंत्राट दिलं होतं, त्या कंपनीने दावे वेळेवर न काढल्यामुळे अनावश्यक त्रुटी काढून विमा बाबत नकारात्मक भूमिका घेतलेली होती. आणि बऱ्याच लोकांच्या तक्रारीतून समोर आला आहे,की कंपनी विम्याचा दावा लवकर येत नाही. त्यामुळे या योजनेला डायरेक्ट महाराष्ट्र सरकार चालवणार असून सुधारणा केलेली आहे.

या योजनेअंतर्गत शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यास कुटुंबीयास दोन लाख रुपयांचा आर्थिक साहित्य जाणार आहे. अपघातामध्ये शेतकऱ्याला कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास आर्थिक मदत दिली जाणार आहे. तसेच अपघातामध्ये दोन अवयवने कामे होऊन शेतकऱ्याला जर कायमस्वरूपी चा अपंगत्व आलं तर त्याला दोन लाख रुपये आणि एक अवयव निकामी होऊन कायमस्वरूपी चा अपंग आल्यास एक लाख रुपये आर्थिक मदत दिली जाणार आहे. या योजनेसाठी पात्रता निकष काय आहे ते खालील प्रमाणे माहिती व्यवस्थितपणे दिली आहे Gopinath Munde Insurance Scheme.

 

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदान योजनेचा पात्रता निकष काय आहे,.? | Eligibility Criteria for Gopinath Munde Insurance Scheme

 

ज्याच्या नावावर शेत जमीन आहे असे सर्व शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत ज्यांच्या नावावर सातबारा नाही पण ती व्यक्ती शेतकरी कुटुंबातील आहे तर अशा कुटुंबातील कोणताही एक सदस्य या योजनेसाठी अर्ज करू शकतो सदरील अर्जदार दहा ते 75 वयोगटातील असावा.

ज्या शेतकऱ्याच्या नावावरती शेत जमीन आहे असे सर्व शेतकरी यासाठी अर्ज करू शकतात तसेच त्यांच्या नावावर अतिशय जमीन नाही अशी शेतकरी सुद्धा अर्ज करू शकतात परंतु त्यांच्या कुटुंबातील नावावर जमीन आहे तर त्याच्यातला कोणताही एक सदस्य या योजनेसाठी अर्ज करू शकतो.

 

अपघाताचे प्रकार | Types of accidents cover in Gopinath Munde Insurance Scheme

 

रस्ता किंवा रेल्वे अपघात पाण्यामध्ये बुडून झालेला मृत्यू

जंतुनाशक हाताळताना किंवा अन्य कारणामुळे झालेली विषबाधा

वीज पडून झालेला अपघात

नक्षलवाद्यांच्या हल्ल्यांमध्ये झालेली हत्या

उंचावरून पडून झालेला अपघात

सर्पदंश विंचुदोष यासारख्या विषारी जनावरांच्या हल्ल्यामुळे दुखापद होऊन झालेला मृत्यू

बाळंतपणातील मृत्यू

दंगलीमध्ये किंवा हल्ल्यामध्ये झालेला मृत्यू.

 

खालील मृत्यूचे प्रकार अपघातासाठी अपात्र आहेत.

नैसर्गिक मृत्यू
योजना चालू होण्यापूर्वी आलेला अपंगत्व

आत्महत्येचा प्रयत्न करणे किंवा जाणीवपूर्वक स्वतःला जखम करून घेणे

गुन्ह्याच्या उद्देशाने किंवा कायद्याच्या उल्लं झालेला अपघात

नशेच्या पदार्थाने झालेला अपघात

म्हणजेच अमली पदार्थांचे सेवन केल्यामुळे झालेला अपघात

भ्रमिष्टपणा

शरीरांतर्गत रक्तस्त्राव

मोटार शर्यतीमध्ये झालेला अपघात

सैन्यातील नोकरी असणारा व्यक्ती या ठिकाणी अर्ज करू शकत नाही.

 

अर्ज कुठे व कसा करायचा.? | How to apply for sanugrah anudan Yojana | Gopinath Munde Insurance Scheme

How to apply for sanugrah anudan Yojana शेतकरी अपघाताच्या मृत्यूच्या तीस दिवसाच्या आत त्याबाबतचा प्रस्ताव संबंधित कुटुंबांना तालुका कृषी अधिकारी कडे जमा करायचा आहे एका साध्या कागदावरती जरी अपघाता विषयी माहिती देऊन सविस्तर अर्ज लिहून अर्ज केला तरी सुद्धा ते पात्र आहे यामध्ये स्वतःबद्दलची माहिती लिहून माहितच नाव तसेच मैद्याच्या सोबतच्या व्यक्तींचे नाव मृत व्यक्तीच्या मृत्यूचा कारन मृत्यूची तारीख इत्यादी माहिती लिहून द्यायचे आहे अपघातात मृत्यू झाला की अपंगत्व आलं ह्या सुद्धा गोष्टी नमूद करायचा आहेत पुढे गोपीनाथराव मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना या योजनेचा लाभ मिळावा असेही लिहायचा आहे ही प्राथमिक माहिती प्राप्त झाल्यानंतर महसूल अधिकारी पोलीस आणि कृषी अधिकाऱ्यांचे पथक घटनास्थळी भेट देऊन चौकशी करेल तसेच आठ दिवसाच्या आत मध्ये तपासणी करून तपासणी अहवाल तहसीलदारांना सबमिट करेल “Gopinath Munde Insurance Scheme”.

अर्जासोबत जोडायची कागदपत्रे | Documents for Sanugrah Anudan Yojana 

मृत्यू च कारण स्पष्ट करणारी सरकारी कागदपत्र अर्थात एफ आय आर

वैद्यकीय अहवाल

पोस्टमार्टम रिपोर्ट

सातबारा उतारा

मृत्यूचा दाखला

शेतकऱ्याचा वारस प्रमाणपत्र

शेतकऱ्याचा तलाठ्याकडे गावचा नमुना नंबर सहा नुसार वारस ची नोंद

मृत्यूची प्राथमिक अहवाल देणारा एफ आय आर

पंचनामा

पोलीस पाटलाचा पंचनामा

शेतकऱ्याच्या वयाची खात्री पटवण्यासाठी आधार कार्ड

मतदान कार्ड वारसाचा आधार कार्ड आणि बँकेचा पासबुक.

 

Gopinath Munde Insurance Scheme

गोपीनाथराव मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेचा अधिकृत जीआर पाहण्यासाठी इथे क्लिक करा.