Solar Panel Yojana घरावरील सोलर पॅनल बसवण्यासाठी मिळेल 50 टक्के अनुदान, अशा पद्धतीने करा अर्ज.

Solar Rooftop Online Application नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या न्युज पेपर वरती घरावरील सौर पॅनल योजनेविषयी सविस्तर माहिती घेणार आहोत. मित्रांनो आपण आपल्या या वेबसाईट वरती शेती विषयक माहिती देतच असतो तसेच आपल्या विद्यार्थिमित्रांसाठी नोकरी विषयक जाहिराती आणि शेतकरी बांधवांसाठी योजनेची माहिती देत असतो. आज या पोस्टमध्ये आपण सोलर पॅनल योजनेबद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत. सोलर पॅनल योजना नक्की काय आहे.? आणि कोणासाठी आहे.? या योजनेची पात्रता काय आहे.? या योजनेसाठी कोणती कागदपत्रे लागणार आहेत.? आणि या योजनेअंतर्गत अर्ज कसा करायचा आहे.? याबद्दल सविस्तर माहिती आज आपण घेणार आहोत. मित्रांनो आपल्या देशात औद्योगिक क्षेत्रात वरचेवर वाढ होत चालली असून यामुळे विजेच्या मागणी दिवसेंदिवस प्रचंड प्रमाणात वाढ होत चाललेली आहे. वीज निर्मितीसाठी वापरण्यात येणाऱ्या कोळशाचा साठा सुद्धा अपुरा पडत चाललेला असून यामुळे पारंपारिक वीज निर्मिती साधने सुद्धा खूपच कमी म्हणजेच अपुरी पडत चाललेली आहेत. यामुळे देशाला पुढच्या येणाऱ्या काही काळात विजेच्या समस्यांना तोंड द्यावे लागणार असून या सर्व गोष्टीचा विचार करून केंद्र सरकार अंतर्गत ऊर्जा मंत्रालयाने सोलार रूफ टॉप योजना राबवण्याचा विचार केलेला आहे. मित्रांनो सोलर पॅनल योजनेच्या सहाय्याने मासिक घरगुती बिलामध्ये बचत करता येणार आहे. आणि मित्रांनो सोलर पॅनल योजनेअंतर्गत तुम्हाला अर्ज करायचा असल्यास खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही अर्ज करू शकता.

 

👇👇👇👇👇

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

 

सोलर पॅनल योजनेचे उद्देश

1) सोलर पॅनल योजनेअंतर्गत आपण मासिक घरगुती बिलामध्ये शंभर टक्के बचत करू शकतो.

2) सोलर पॅनल लावल्यात आलेल्या नेट मीटर द्वारे शिल्लक वीज महावितरण प्रति युनिट प्रमाणे आपल्याकडून विकत घेऊन आपल्याला पैसे सुद्धा आपण घेऊ शकतो.

3) पारंपरिक ऊर्जा स्त्रोत वरील ताण कमी करून सौर ऊर्जेच्या वापराला प्रोत्साहन देण्याचा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.

4) राज्यातील व्यक्तींचे जीवनमान सुधारणे हा देखील एक यामागील उद्देश आहे.

5) राज्यातील गोरगरीब नागरिकांचा सामाजिक तसेच आर्थिक विकास करणे.

6) राज्यावरील विजेचा भार शंभर टक्के कमी करणे.

7) प्रदूषण विरहित वीज निर्मितीला प्रोत्साहन देणे.

 

सोलर पॅनल योजनेची वैशिष्ट्ये

1) सोलर पॅनल योजना महाराष्ट्र शासनाद्वारे सुरू करण्यात आलेली एक महत्त्वकांंक्षी योजना आहे.

2) या योजनेअंतर्गत तुम्ही तुमच्या घरावर तब्बल पन्नास टक्के अनुदानावर सोलर पॅनल बसू शकतात.

3) सोलर पॅनल योजनेच्या सहाय्याने राज्यातील नागरिक विजेच्या बाबतीत आत्मनिर्भर बनतील.

4) या योजनेअंतर्गत तुमच्या घरगुती वीज बिलाची बचत होऊन तुमच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होणार आहे.

5) मित्रांना सोलर पॅनल योजनेअंतर्गत 50 टक्के अनुदान रक्कम डीबीटीच्या सहाय्याने तुमच्या खात्यात जमा केली जाणार आहे.

👇👇👇👇👇

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा