नमस्कार आज आम्ही आपणासाठी घेऊन आलो आहोत. शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने राज्य सरकारने चालू केलेल्या योजना विषयी माहिती.
शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करण्याचे उद्दिष्ट राज्य आणि केंद्र सरकारचे पण आहे.
शेतकऱ्यांना या योजनेचा माध्यमातून आर्थिक मदत मिळावी यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून अनेक लाभदायक योजना राबविण्यात येत आहेत.
👇👇अशाच नवनवीन बातम्या आपल्या मोबाईलवर मोफत वाचण्यासाठी आमच्या शेतकरी ग्रुपमध्ये सामील व्हा 👆👆
यासोबतच योजनांचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी अनेक पोर्टल आणि हेल्पलाईन क्रमांक इत्यादी देखील कार्यरत आहेत.
MahaDBT 2024 मध्ये सरकारने केला मोठा बदल
हा प्रयत्न पुढे नेत, महाराष्ट्र सरकारने महाडीबीटी पोर्टल योजना सुरू केली आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना एक नवीन मदत मिळाली आहे.
२०२४ मध्ये या सर्व योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने सर्व शेतकऱ्यांना आपल्या जवळच्या सीएससी केंद्रात जाऊन अर्ज करणे आवश्यक असणार आहे.
आणि यासाठी अर्ज करण्यास सुरुवात झाली असून आपले सरकार सेवा केंद्र च्या अधिकृत वेबसाईट वर जाऊन सर्व इच्छुक शेतकरी अर्ज करू शकणार आहेत.
आता यासाठी संपूर्ण प्रक्रिया अतिशय गतिमान करण्यात आली आहे.
आता आपण पाहणार आहोत आपण २०२३ मध्ये अर्ज केलेल्या योजनांची सोडत लवकर होणार आहे.
महाडीबीटी द्वारे शेतकऱ्यांना ट्रॅक्टर, कडबा कुट्टी, पॉवर ट्रेलर यांच्यासह अनेक कृषी यंत्र आणि शेतीशी निगडित अवजार खरेदीसाठी अनुदान दिले जाते.
त्याची आता लवकरच सोडत होणार आहे
या अनुदानाचा आजवर अनेक शेतकऱ्यांनी फायदा घेतला आहे.
हेही वाचा👇👇
👉मोदी है तो मुमकिन है मोदी सरकारने देशावरील कर्जाची रक्कम केली तिप्पट👈
कृषी यांत्रिकीकरण अभियान योजनेअंतर्गत शेती व शेतकरी यांच्याशी संबंधित क्षेत्रांना
अधिक सोयीस्कर बनवण्यासाठी नवनवीन टेक्नॉलॉजी चा वापर करून शेतकऱ्यांना
शेती करण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी महाडीबीटी कृषी उपकरणांना केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्यामार्फत अनुदान दिले जाते.
केंद्र व राज्य सरकारची शेतकऱ्यांसाठी ची ही एक अत्यंत महत्त्वाची योजना आहे.
कृषी यांत्रिकीकरण उप अभियान या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आधुनिक
कृषी यंत्रे व त्यासोबत उपकरणांच्या खरेदीवर तब्बल 50 ते 60 टक्क्यांपर्यंत अनुदान दिले जायचे.
या योजनेचा आजवर अनेक शेतकऱ्यांनी लाभ देखील घेतला आहे.
आता मात्र या योजनेत सरकारकडून मोठा बदल करण्यात आला आहे आणि हे शेतकऱ्यांना एक मोठे गिफ्ट असणार आहे.
कारण काही यंत्रांच्या खरेदीत अनुदानामध्ये सरकारकडून या नविन वर्षात तब्बल तीनपट वाढ करण्यात आली आहे.
हे पण वाचा 👇👇
👉 शेतकऱ्याच्या पांढऱ्या सोन्याची हेळसांड👈
यामध्ये ट्रॅक्टर, पॉवर टिलर व कम्बाईन हार्वेस्टर यांचा समावेश करण्यात आला आहे.
महाडीबीटी द्वारे मिळणाऱ्या या अनुदानासाठी शेतकऱ्यांनी ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करणे आवश्यक असणार आहे.
या योजनेअंतर्गत पॉवर ट्रेलर खरेदीसाठी 01 लाख 20,000 अनुदान दिले जात होते.
तर आता नविन हार्वेस्टर साठी 8 लाख अनुदान जाहीर करण्यात आले आहे, व ट्रॅक्टर साठी 5 लाख रुपये अनुदान दिले जाणार आहे.