हे १८० आहेत प्रश्न मराठा समाजाचं मागासलेपण तपासण्यासाठीच्या सर्वेक्षणाचं काम ३ शिफ्टमध्ये करा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत मराठा समाजाचं सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक मागासलेपण तपासण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगामार्फत मंगळवारपासून युद्धपातळीवर सर्वेक्षण सुरू झाले आहे .

हे  सर्वेक्षण अतिशय महत्वाचं असून तीनही शिफ्ट्समध्ये काम करावं असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले.

👇👇अशाच नवनवीन बातम्या आपल्या मोबाईलवर मोफत वाचण्यासाठी आमच्या शेतकरी ग्रुपमध्ये सामील व्हा 👆👆

 

ते वर्षा निवासस्थानी मराठा आरक्षणविषयक बैठकीत राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त यांच्याशी दूरदृश्य प्रणालीद्वारे बोलत होते.

या कामाला सर्वोच्च प्राधान्य देऊन कालबद्धरितीने अचूक सर्वेक्षण करण्यासाठी गावोगावी दवंडी द्या,

सूचना फलकांवर माहिती द्या, लोकांना या सर्वेक्षणाविषयी कळू द्या असं त्यांनी सांगितलं.

सर्वेक्षणासाठी सर्व शासकीय यंत्रणा सज्ज ठेवण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

मागासवर्ग आयोगाच्या सर्वेक्षणाचचं काम २३ जानेवारी ते ३१ जानेवारीपर्यंत होणार असून मराठा आणि बिगर मराठा खुल्या प्रवर्गाचं सर्वेक्षण करण्यात येईल.

या माध्यमातून राज्यातील अंदाजे अडीच कोटी कुटूंबांचे सर्वेक्षण होणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

सर्वेक्षणासाठी २४ तास कॉल सेंटर सुरु ठेवायचं आवाहनही त्यांनी केलं.

प्रगणकांचं तसंच अधिकाऱ्यांचं प्रशिक्षण व्यवस्थितपणे करावं असंही त्यांनी सांगितलं.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी, आंदोलनकर्ते मनोज जरांगे जालना जिल्ह्यातल्या आंतरवाली सराटीमधून मुंबईकडे रवाना झाले.

राज्यात ५४ लाख नोंदी सापडल्या आहेत, तरीही सरकार निर्णय घेत नाही, असं ते म्हणाले. लाखो मराठाबांधव या पायी दिंडीत सहभागी झाले असून, ही पदयात्रा २६ तारखेला मुंबई इथे पोहचणार आहे.

त्यांना पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा मोर्चाचे सदस्य राज्याच्या विविध भागातून मुंबईकडे रवाना झाले आहेत.

हेही वाचा 👇👇

👉सरकारच्या रडीचा डाव मनोज जरांगेना आझाद मैदानावर उपोषणाची परवानगी नाकारली👈

सर्वेक्षणात कोणते प्रश्न विचारले जातील?

सुरुवातीला तुमचं नाव शिक्षण वय विचारल जाईल?

तुमच्या समाजात विधवा स्त्रियांना कपाळाला कुंकू लावण्याची परवानगी आहे का?

लग्न झालेल्या स्त्रियांनी डोक्यावर पदर घेतलाच पाहिजे असा नियम आहे का?

समाजात जागरण गोंधळ किंवा अन्य विधीसाठी कोंबडा किंवा बोकड कापण्याची पद्धत आहे का?

हे आणि असे एकूण १८० प्रश्न  विचारून हे सर्वेक्षण केलं जाणार आहे.

मागासवर्ग आयोगाने या सर्वेक्षणासाठी एक प्रश्नावली निश्चित केली आहे.

त्यानुसार मुख्यतः पाच प्रकारचे प्रश्न विचारले जातील.

यातल्या मॉड्यूल ए मध्ये तुमच्या कुटुंबाची मूलभूत माहिती, तुमचं नाव, पत्ता, तुम्ही मराठा आहात का, कुणबी मराठा, मराठा कुणबी नसाल तर तुमची जात कोणती असे एकूण १४ प्रश्न विचारले जातील.

मॉड्यूल बी मध्ये तुम्ही कोणत्या घरात राहता?                     घर मालकीचे आहे का ?

तुमचं कुटुंब संयुक्त आहे की विभक्त आहे?

तुमच्या जातीचा पारंपरिक व्यवसाय कोणता?

सध्या तुम्ही काय करता?

तुमच्या कुटुंबात लोकप्रतिनिधी आहेत का? असे एकूण २० प्रश्न असतील.

मॉड्यूल ‘सी’ मध्ये तुमच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला जाईल.

तुमच्या घरात शौचालय आहे का?

आपणाकडे दुचाकी आहे का?

तुमच्या कुटुंबात कोणी रिक्षा ड्रायव्हर आहे का?

तुमच्याकडे शेती आहे का? असेल तर ती कुणाच्या नावावर आहे? का तुम्ही भुमिहीन शेतमजुर आहात का?

तुमच्या कुटुंबावर किती कर्ज आहे?

मागच्या पंधरा वर्षांमध्ये तुम्ही स्थावर मालमत्ता विकली आहे का? किंवा विकली आहे.

मागील २० वर्षापासून आपण येथेच राहता का?

तुमच्या कुटुंबातील एखादी महिला इतरांच्या घरी धुणी भांडी, स्वयंपाक, झाडलोट करायला जाते का?

असे एकूण 76 प्रश्न असतील.

हे ही पाहा 👇👇

👉मरा‌ठा आरक्षणासाठी आलेल्या मागासवर्गीय आयोगाच्या सर्वे मध्ये आलेल्या अधिकाराचा सावळा गोंधळ 👈

या प्रश्नावलीच्या मॉड्यूल ‘डी’मध्ये समाजाचं मागासलेपण तपासलं जाईल.

साप चावल्यानंतर तुम्ही कुठे जाता दवाखाना की मांत्रिक.      विंचू चावल्यानंतर तुम्ही कुठे जातात.                                 कावीळ झाल्यानंतर तुम्ही मांत्रिकाकडे जाता की दवाखान्यात?

आजारी पडल्यावर अंगारा धुपारा करता की दवाखान्यात जाता.

तुमच्या समाजात हुंडा देण्याची पद्धत आहे का?

विधवा स्त्रियांना मंगळसूत्र घालण्याची परवानगी आहे का?    विधवा स्त्रियांचे पुनर्विवाह करतात का?

तुमच्या कुटुंबात मुलांच्या लग्नाचा निर्णय कोण घेतं? वडील की आई

गेल्या दहा वर्षांत तुमच्या कुटुंबातील कुणी आत्महत्या केली आहे का?

असे एकूण 33 प्रश्न असतील.

मॉड्यूल ‘ई’मध्ये कुटुंबाच्या आरोग्याबाबत एकूण अकरा प्रश्न विचारले जातील. 

मॉड्युल एफ मध्ये आपणास किती अपत्य व त्यांचे शिक्षण व शाळा सरकारी अनुदानित खाजगी हे विचारलं जाईल?

असे एकूण १८० प्रश्न विचारून तुमचे कुटुंब सामाजिक, आर्थिक दृष्ट्या मागास आहे की नाही हे ठरवलं जाईल?