Breaking news सरकारची कपट निती मनोज जरांगेना आझाद मैदानावर उपोषणाची परवानगी नाकारली

नमस्कार मित्रांनो आज आपण पाहू आमच्या न्यूज पोर्टलवर मराठा आरक्षण मोर्चा संबंधी महत्त्वाची बातमी.

Breaking news सरकारची कपट निती मनोज जरांगेना आझाद मैदानावर उपोषणाची परवानगी नाकारली.

👇👇अशाच नवनवीन बातम्या आपल्या मोबाईलवर मोफत वाचण्यासाठी आमच्या शेतकरी ग्रुपमध्ये सामील व्हा 👆👆

ज्या अर्थी, आपण लाखोच्या संख्येने आंदोलक व वाहनांसह मुंबईत येणार असल्याचे घोषित केले आहे,

त्यामुळे मुंबईतील दैनंदिन जनजीवन विस्कळीत होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची दाट शक्यता आहे.

तसेच मुंबईची भौगोलिक स्थिती, लोकसंख्या, वाहनांची संख्या, अरुंद रस्ते, उपलब्ध नसलेले पर्यायी रस्ते,

खोळंबणारी वैद्यकीय सोयीसुविधा, त्यामुळे होणारी रुग्णांची हेळसांड व इतर अत्यावश्यक सेवांवर होणारा प्रभाव पाहता मुंबईतील एकूण सार्वजनिक सुव्यवस्थेवर विपरीत परिणाम होणार आहे.

त्याचप्रमाणे आपण वेळोवेळी सांगितल्याप्रमाणे हे आंदोलन प्रचंड संख्येचे असून मुंबईमधील कोणत्याही मैदानामध्ये एवढ्या प्रचंड मोठया संख्येच्या आंदोलकांना सामावून घेण्याची क्षमता नाही.

हे ही वाचा 👇👇

👉मराठा आरक्षणासाठी आलेल्या मागासवर्गीय आयोगाच्या सर्वे मध्ये आलेल्या अधिकाराचा सावळा गोंधळ👈

त्याचप्रमाणे सदरचे आंदोलन हे अनिश्चित कालीन असल्याने त्यासाठी आवश्यक सोयी सुविधा दीर्घकाळासाठी मुंबईमध्ये पुरविणे शक्य होणार नाही.

व त्याचा परिणाम सार्वजनिक आरोग्य व इतर नागरी सुविधांवर होणार आहे.

ज्या अर्थी मा. उच्च न्यायालय, मुंबई यांनी आम्हांस आंदोलनासाठी योग्य जागा आपणांस कळविण्याबाबत निर्देश दिलेले आहेत.

त्याअर्थी आपणास शांततामय मार्गाने आंदोलन करण्यासाठी इंटरनॅशनल कॉर्पोरेशन पार्क मैदान, सेंटर पार्क जवळ, सेक्टर २९, खारघर, नवी मुंबई हेच मैदान संयुक्तिक राहील.

तरी सदर ठिकाणी आंदोलन करण्याकरिता आपण संबंधित प्राधिकरणाकडे अर्ज करुन रितसर परवानगी घ्यावी.

असे आझाद मैदान पोलिसांच्या आडुन सरकार सांगत आहे.

म्हणून ज्याअर्थी मा. उच्च न्यायालय, मुंबई यांनी क्रिमिनल रिट पिटीशन क. १८८/२०२४ यामध्ये दि. २४.०१.२०२४ रोजी दिलेल्या अंतरिम आदेशामध्ये उद्धृत केलेले मा. सर्वोच्च न्यायालय,

हेही पाहा 👇👇

👉एक कोटी गरिबांच्या घरातील अंधार दूर होणार नरेंद्र मोदी ची घोषणा👈

नवी दिल्ली यांचे अमित साहनी वि. पोलीस आयुक्त व इतर या प्रकरणातील न्याय निर्णय (विशेषतः परिच्छेद क. १७, १९ व २१ मध्ये दिलेले दिशानिर्देश), तसेच मा. सर्वोच्च न्यायालय व विविध उच्च न्यायालये यांनी वेळोवेळी निर्गमित केलेल्या इतर न्याय निर्णयामध्ये आंदोलनकर्त्यासाठी दिलेले निर्देश यांचे तंतोतंत अनुपालन आपण रस्त्यावर

आणि सार्वजनिक ठिकाणांवर करणे अनिवार्य आहे.

त्याचे अनुपालन न केल्यास मा. सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालय यांची अवमानना होईल याची आपण नोंद घ्या

वी.मनोज जरांगे पाटील यांना मुंबई पोलिसांनी नोटिस बजावली असून आझाद मैदानाऐवजी खारघरच्या सेंट्रल पार्क मैदानात आंदोलन करण्याचे आदेश दिले आहेत.

या आंदोलनामुळे मुंबईचं जनजीवन विस्कळीत होण्याची पोलिसांना भीती असून यामुळे अधिकाऱ्यांकडून जरांगेना नोटिस बजावण्यात आली आहे.

दरम्यान, जरांगेंनी शिवाजी पार्क मैदानाची परवानगी मागितली होती.

पोलिसांनी ती नाकारली असून मनोज जरांगेंना मुंबई बाहेर रोखण्याचे सरकारचे प्रयत्न असल्याची चर्चा आहे.