नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या न्यूज पोर्टलवर महत्वाची बातमी पाहणार आहोत मंगळवार दिनांक 22 रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राम मंदिर उद्घाटना दिवशी देशवासियांना आणखी एक भेट दिली आहे.
श्रीराम मंदिरात प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा केल्यानंतर दिल्लीत आल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक मोठी घोषणा केली आहे.
👇👇अशाच नवनवीन बातम्या आपल्या मोबाईलवर मोफत वाचण्यासाठी आमच्या शेतकरी ग्रुपमध्ये सामील व्हा 👆👆
मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महत्त्वाची सोलार योजना जाहीर केली आहे.
सोमवारी राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर दिल्लीत परतताच पंतप्रधान मोदी यांनी पंतप्रधान सूर्योदय योजनेची घोषणा केली.
या योजनेअंतर्गत देशातील घरांच्या छतावर सोलार पॅनेल बसवण्यात येणार आहेत.
पंतप्रधान मोदी यांनी या घोषणेची घोषणा करताना सांगितलं की, या योजनेअंतर्गत एक कोटीहून अधिक घरांच्या छतावर सोलर सिस्टीम बसवण्यात येईल.
या योजनेमुळे प्रधानमंत्री सूर्योदय ‘योजने’मुळे गरिब कुटुंबातील पहिल्या टप्प्यात एक कोटी नागरिकांचे वीज बिल वाचणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी ‘प्रधानमंत्री सूर्योदय योजने’ची घोषणा केली.
या योजनेतून गरीब आणि मध्यमवर्गीयांचे वीज बिल तर कमी होईलच, शिवाय ऊर्जा क्षेत्रातही भारत देश स्वयंपूर्ण होईल, असेही मोदी म्हणाले.
या योजनेंतर्गत सरकारने एक कोटी घरांवर रूफटॉप सोलर बसवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
हे ही पाहा 👇👇
👉MSRTS भरती पात्रता आणि पगार येथे पहा 👈
प्रधानमंत्री सूर्योदय ‘योजनेचे फायदे-
सौर ऊर्जेपासून वीज उपलब्ध करून देण्यासाठी एक कोटी गरीब ते मध्यमवर्गीय कुटुंबांना छतावरील सोलर पॅनेलने सुसज्ज करण्याचे या योजनेचे उद्दिष्ट आहे.
या योजनेमुळे गरीब आणि मध्यमवर्गाचे वीज बिल तर कमी होईलच, शिवाय भारत ऊर्जा क्षेत्रातही आत्मनिर्भर होईल, असेही मोदी म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधिकाऱ्यांना निवासी विभागातील ग्राहकांना मोठ्या संख्येने रूफटॉप सोलरचा अवलंब करण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी एक व्यापक राष्ट्रीय मोहीम सुरू करण्याचे आवाहन केले आहे.
रूफटॉप सोलर पॅनेल म्हणजे इमारतीच्या छतावर बसवलेले फोटोव्होल्टिक पॅनेल जे मुख्य वीज पुरवठा युनिटला जोडलेले असतात.
त्यामुळे ग्रीडकनेक्टेड विजेचा वापर कमी होतो आणि ग्राहकांच्या वीज खर्चात बचत होते.
सोलर रूफटॉप सिस्टीममध्ये केवळ आगाऊ भांडवली गुंतवणूक आणि देखभालीसाठी कमीत कमी खर्च येतो.
केंद्र सरकारने २०१४ मध्ये रूफटॉप सोलर प्रोग्राम सुरू केला, ज्याचे उद्दीष्ट २०३० पर्यंत ४० हजार मेगावॉट किंवा ४० गिगावॅटची क्षमता साध्य करणे आहे.
हे ही वाचा 👇👇
👉येथे करा अर्ज सुर्योदय योजनेचा अर्ज 👈
काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
पंतप्रधान मोदी यांनी पंतप्रधान सूर्योदय योजनेची घोषणा करताना सांगितलं की, ”अयोध्येतून परतल्यानंतर मी पहिला निर्णय घेतला आहे की, आमचे सरकार एक कोटी घरांवर रुफटॉप सोलर बसवण्याचे लक्ष्य घेऊन प्रधानमंत्री सूर्योदय योजना सुरू करणार आहे.
यामुळे गरीब आणि मध्यमवर्गीयांचे वीज बिल तर कमी होईलच, पण ऊर्जा क्षेत्रात भारत स्वावलंबी होईल.”