मराठा आरक्षणासाठी आलेल्या मागासवर्गीय आयोगाच्या सर्वे मध्ये आलेल्या अधिकाराचा सावळा गोंधळ विडियो व्हायरल

नमस्कार मित्रांनो आम्ही आज आपल्या न्यूज पोर्टलवर महत्त्वाची अशी बातमी घेऊन आलो आहोत सध्या गाजत असलेला मराठा आरक्षण या मुद्द्यावर सरकारने राज्यात मागासवर्ग आयोगाचा सर्वे चालू केला आहे.

यामध्ये तर सरवेअर म्हणून शिक्षक महसूल व नगरपंचायत नगर परिषद कर्मचारी आहेत काही कर्मचाऱ्यांना तर या सर्वेचा कसलाही गंध नाही

👇👇अशाच नवनवीन बातम्या आपल्या मोबाईलवर मोफत वाचण्यासाठी आमच्या शेतकरी ग्रुपमध्ये सामील व्हा 👆👆

मराठा समाजाच्या सर्वेक्षणावेळचा सावळा गोंधळ समोर आला आहे.

अहमदनगरमध्ये मराठा सर्वेक्षणातील गोंधळाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे.

टिव्ही रिपोर्टनुसार या व्हिडीओमध्ये मराठा युवकांनी सर्वेक्षण न करता येणाऱ्या अधिकाऱ्याचा व्हिडीओ शुट करून व्हायरल केला आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमधील व्यक्ती हा सर्वेक्षण करणारा आहे मात्र,

त्याला मोबाईल आणि सर्वेक्षणाचे ॲप वापरता येत नाही असं व्हिडीओमध्ये दिसत आहे.

दरम्यान, मराठा समाजाकडून या घटनेनंतर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

सरकार मराठा समाजाची चेष्टा करत आहे असे काही समाजातील लोक सध्या बोलत आहेत.

त्याचबरोबर या सर्वेक्षणावर प्रश्नचिन्ह निर्माण केलं जात आहे.

हे ही वाचा 👇👇

👉आता एक कोटी गरिबांच्या घरातील अंधार दूर होणार पंतप्रधान मोदीची घोषणा👈

व्हायरल व्हिडीओमध्ये काय आहे?

मराठा समाजाचा व्यक्ती- तुमचं नाव सांगा

अधिकारी- मनोज काशिनाथ कांबळे, मी मराठा सर्वेक्षणासाठी आलो आहे.

मराठा समाजाचा व्यक्ती- (अधिकाऱ्याला प्रश्न करतो) आपण कुठे आहात कामाला?

अधिकारी- महानगरपालिका केडगाव

मराठा समाजाचा व्यक्ती- मराठा सर्वेक्षणासाठी आपली काही ट्रेनिंग झाली आहे का?

अधिकारी- ट्रेनिंग झाली आहे. पण, माझं शिक्षण कमी असल्याने मला यातील जास्त काही माहिती नाही.

त्यामुळं मी एक जोडीदार घेतला, त्याकडून मी अशी माहिती भरून घेतो.

मराठा समाजाचा व्यक्ती- हा तुमचा जोडीदार आहे का?

अधिकारी- हो

मराठा समाजाचा व्यक्ती- या सर्वेमध्ये तुम्ही कोणती माहिती घेत आहात.

अधिकारी- नाव, नंबर, आधार कार्ड अशी माहिती घेतो.

मराठा समाजाचा व्यक्ती- बाकीची माहिती? घर आहे का? काय काम करतो? व्यवसाय काय आहे?

अधिकारी- मला तर यातील जास्त काही कळत नाही.

मराठा समाजाचा व्यक्ती- आपण पालिकेत कोणतं काम करता?

अधिकारी- इलेक्ट्रिक मदतनीस

मराठा समाजाचा व्यक्ती- या सर्वेची तुम्हाला ट्रेनिंग दिली आहे का?

अधिकारी- ट्रेनिंग दिली आहे. पण, मला यातला काही अनुभव नाही, शिक्षण पात्रता नसल्यामुळे.

मराठा समाजाचा व्यक्ती- हा सर्वे मोबईल वरती आहे. तुम्हाला मोबाईल हाताळता येतो का?

अधिकारी- नाही येत

हे ही पाहा 👇👇

👉विडियो पहाण्यासाठी येथे क्लिक करा 👈

 

मराठा समाजाचा व्यक्ती- तुम्हाला मोबाईल हाताळता येत नाही मग तुम्ही सर्वेक्षण कसं करणार?

अधिकारी- मी हे आधिकाऱ्यांनाही सांगितलं, मला यातलं काही जमत नाही, त्यावर त्यांनी सांगितलं आता ते माझ्याकडे नाही, तुम्ही तुमचं बघा.

कोणीही जोडीदार घ्या आणि काम करा.

मराठा समाजाचा व्यक्ती- ही मोठी जबाबदारी आहे.      मराठा समाजाचं आरक्षण तुमच्या या सर्वेवर अवलंबून आहे. चुकीच्या पध्दतीने सर्वे झाला तर आम्हाला आरक्षण कसं मिळेल जे आमच्या हक्काचं आहे.

अधिकारी- साहेब, मला यातील अनुभव नाही, माझं शिक्षण नाही. मी पहिली पास आहे.

अत्यंत धक्कादायक असा हा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे.

हा व्हिडीओ नगर जिल्ह्यातील आहे. यामुळे मराठा समाजाकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

सध्या काही बांधव असेही बोलतात सध्या मराठा समाजाचा मोर्चा हा लोणावळ्याच्या पुढे गेला असून तो लवकरच मुंबईच्या हद्दीत प्रवेश करेल आणि मग सरकारला कळेल