Onion कांद्याने केला पाकिस्तानचा वांदा कांदा पाकिस्तानात ग्राहकांना रडतोय आणि भारतात उत्पादकांना

नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण पाहणार आहोत मोदी सरकारने केलेल्या कांद्याच्या वांद्याबदल मोदी सरकारने कांद्याच्यी 31 मार्च पर्यंत निर्यातबंदी केली आहे.

देशात कांद्याच्या दरात वाढ होत आहे. प्रतिकिलो कांद्याचे दर हे 50 ते 60 रुपयांच्या आसपास असताना.

तर काही ठिकाणी कांद्याचे दर हे 70 ते 80 रुपये किलोच्या आसपास होते.

दरम्यान, देशात कांद्याचे दर वाढले की आरडाओरड सुरु झाली.

लगेच आपले शेतकरी प्रिय पंतप्रधानांनी कांद्याच्यी निर्यात बंदी करुन सर्वसामान्य शेतकऱ्यांच्ये कंबरडे मोडून टाकले.

आणि कांद्याचे दर लगेच काही दिवसात दहा ते बारा रुपये किलोच्या आसपास आले.

👇👇अशाच नवनवीन बातम्या आपल्या मोबाईलवर मोफत वाचण्यासाठी आमच्या शेतकरी ग्रुपमध्ये सामील व्हा 👆👆

शेतकऱ्याच्या मालाला दर मिळाला की लगेच सर्वसामान्य जनतेच बजेट कोसळल्याचं बोललं जातं.

मात्र, तुम्हाला पाकिस्तानात कांद्याला प्रति किलोला किती दर मिळतो हे माहिती आहे का?

चला आज आपण आपल्या आरडी न्यूज या पोर्टलवर पाहुयात त्याबद्दल माहिती.

पाकिस्तानात प्रतिकिलो कांद्याला 130 ते 140 रुपयांचा दर आहे तसं बघितलं तर भारताच्या दहा ते पंधरा पट जास्त काद्यांचे दर आहेत पाकिस्तानात.

अमेरिकेत कांद्याचे दर हे प्रति किलोसाठी 240 ते 250 रुपयांपर्यंत आहेत.

तर पाकिस्तानातील काही शहरांमध्ये कांद्याचे दर हे 150 रुपयांच्या पुढे गेले आहेत.  

हे ही वाचा 👇👇

👉महाडीबीटी 2024 मध्ये केला मोठा बदल पहा सविस्तर👆👆

सरकारने कांद्याच्या निर्यातीवर बंदी 

सध्या कांद्याच्या दरात सातत्यानं वाढ होत आहे.            याचा शेतकऱ्यांना फायदा होत आहे.                            मात्र, कांद्याचे दर वाढल्यानं, सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागत असल्याचे बोलले जात आहे.

तसेच कांद्याचे दर वाढले की सर्वसामान्यांचे बजेट कोलमडल्याचे बोलले जाते.

त्यामुळं कांद्याच्या किंमती नियंत्रीत ठेवण्यासाठी सरकार सातत्यानं प्रयत्न करत आहे.

कांद्याचे वाढते दर कमी करण्यासाठी सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे, सरकारनं कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली आहे.

अचानक घातलेल्या निर्याबंदीमुळं देशातील शेतकरी व्यापाऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

केंद्र शासनाकडून 31 मार्च 2024 पर्यंत कांदा निर्यातीवर बंदी घालण्यात आली आहे.

कांद्याच्या वाढत्या भावावर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र शासनाने निर्यात बंदीचा घेतला निर्णय घेतला आहे.

सरकारच्या या निर्णयानंतर लासलगाव, मनमाड, नांदगावसह बहुतांश बाजार समित्यात कांद्याचे लिलाव बंद आहेत.

नाशिकच्या उमराणे येथे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी मुंबई – आग्रा महामार्ग रोखला होता.

दिल्लीतील बाजारात स्थानिक विक्रेते 70 ते 80 रुपये किलो दरानं कांद्याची विक्री करत आहेत.

मात्र, आता निर्यातबंदी केल्यानं दरात घसरण झाली आहे आता दर फक्त 20/30 दरम्यान आहे.

हे पण वाचा👇👇

👉मोदी है तो मुमकिन है मोदी Debt to the country👈

कांद्याची निर्यात बंदी शेतकऱ्यांना उध्वस्त करणारी

भारताचा कांदा हा विविध देशांमध्य निर्यात केला जातो. भारतीय कांद्याला परदेशात मोठी मागणी देखील आहे. बांगलादेश, मलेशिया आणि संयुक्त अरब अमिराती हे तीन प्रमुख कांद्याचे आयातदार देश आहेत.

मात्र, अचानक सरकारनं निर्यातबंदीचं हत्यार उपसलं आहे.

याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे.           कांद्याची निर्यात बंदी शेतकऱ्यांना उध्वस्त करणारी आहे.

आता जर आपल्या कांदा बाहेर गेला तर आपल्या शेतकऱ्यांना चांगला दर मिळून त्यांच्याकडे चार पैसे राहिले असते हे आपल्या प्रधानसेवकाला खपले नाही.