Rain touch नावाखाली कवडीमोल दराने खरेदी शेतकऱ्याच्या पांढऱ्या सोन्याची हेळसांड

नमस्कार मित्रांनो आज आपण शेतकऱ्यांच्या पांढऱ्या सोन्याची कशी झाली हेळसांड ही बातमी पाहणार आहोत.

कापसाला चांगले दर मिळतील या आशेने राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी गेल्या वर्षीच्या तुलनेने यंदा कपाशीच्या लागवड क्षेत्रात वाढ केली.

👇👇अशाच नवनवीन बातम्या आपल्या मोबाईलवर मोफत वाचण्यासाठी आमच्या शेतकरी ग्रुपम‌ध्ये सामील व्हा 👆👆

मात्र, नैसर्गिक संकटे अन् शेती विषयी सरकारची धोरणे.

शेतमालाला मिळत असलेल्या अत्यल्प भावामुळे शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडली असल्याची स्थिती राज्यातील शेतकऱ्यांमध्ये दिसून येत आहे.

Rain touch नावाखाली कवडीमोल दराने कापूस खरेदी होत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.

यंदा निसर्गाच्या लहरीपणाचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.

सुरुवातीला बाजरी,सोयाबीन पिकाचे नुकसान केले.

त्यानंतर शेतकऱ्यांची कापसावर मदार होती कमी पावसामुळे तेही निम्म्यावर आले.

शेत शिवारात वेचणी साठी आलेला कापूस अवकाळी पावसाने भिजला.

आधीच निसर्गाचे संकट कमी होते की काय त्यात भर म्हणून आता कवडीमोल भाव मिळत आहे.

शेती  मशागती पासून ते काढणी अन् बाजारात शेतमाल विक्रीसाठी घेऊन जाउ पर्यंत.

खर्चाचा विचार केल्यास मिळत असलेल्या भावामुळे हाती काहीच उरेनासे झाल्याचे शेतकऱ्यांमधून भावना वक्त होत आहेत.हे ही वाचा 👇👇

👉आता ५०० रुपयांच्या नोटांवर हा फोटो येणार 👈

यातही बाजारात त्या ‘Rain touch’ कापसाच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या कापसाला भाव मिळेना.

आपले पंतप्रधान यांनी ऑस्ट्रेलिया मागवलेला कापूस गाठी कारण गुजरात कापुस मार्केट सध्या या कापसावरच अवलंबून आहे.

रबी हंगामातील ज्वारी, गहू, हरभरा व तुरीला व फळबागांना आदी पिकांना अवकाळी व धुक्याने फटका बसल्याची स्थिती असून,

शासनाने शेतमाल दरवाढीसाठी प्रयत्न करावे, अशी मागणी होत आहे.

शेतकऱ्यांचे नगदी पीक म्हणून ओळखले जाणार पांढऱ्या सोन्याची हेळसांड सुरुच आहे शेतकऱ्याच्या पदरी यावर्षीही निराशा.

घरात कापूस सुरक्षित ठेवणे हेही जिकिरीचे काम आहे.

शार्टसर्किट, गॅस लिकेज किया चुलीमधील विस्तवामुळे आग लागण्याची भीती असते.

अनेक शेतकऱ्यांकडे कापूस साठवणुकीसाठी गोदाम नसल्याने ते घरातच कापूस ठेवतात,

त्यातच गावामध्ये आग नियंत्रणासाठी साधने उपलब्ध होत नसतात.

त्यामुळे अधिक काळ घरात कापूस ठेवणे धोकादायक झाले आहे.खर्च दुप्पट मात्र उत्पन्न कमी.हे पण वाचा👇👇

👉आता एक कोटी गरिबांच्या घरातील अंधार दूर होणार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ची घोषणा👈

दिवसेंदिवस शेती व्यवसाय तोट्याचाच ठरत असल्याचे दिसून येते.

कोणतेही उत्पादन घेणे आवाक्याबाहेरचे झाले आहे.       शेती कामासाठी ऐनवेळी मजूरही मिळत नाही.

शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी शासन प्रयत्न करीत असले तरी ते फक्त कागदावरच आहेत.

वास्तावात मात्र, शेतमालाच्या भावावाढीची स्थिती उत्पन्नापेक्षा खर्चच अधिक असल्याची आहे.

यामुळे शेतकऱ्यांना शेती करावी, तर कशी असा सवाल उपस्थित होत आहे.

एकीकडे औषधी, खते, बी-बियाणांच्या किमतीत दरवर्षी काहीना काही वाढ होते.

मात्र, शेतमालाच्या बाबतीत सरकार कधी विचार करणार व शेतकऱ्यांना कधीच सुखी करणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे.