नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्य मध्ये तब्बल 18000 पोलीस पदांची भरती केली जाणार असून १९६० नंतर प्रथमच पोलीस दलासाठी नवीन आकृतीबंध तयार करण्यात येणार आहे. आणि मित्रांनो याबद्दल सविस्तर शासन निर्णय तसेच याबद्दल सविस्तर माहिती आज आपण आपल्या या न्यूज पोर्टल वरती आपली पोलीस भरतीचे तयार करणारे जे विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणी आहेत त्यांच्यासाठी ही माहिती आपण घेऊन आलेलो आहोत.
राज्यात तब्बल 18 हजार पोलीस पदांची भरती (Maharashtra Police Bharti 2023) केली जाणार आहे. 1960 नंतर प्रथमच पोलिस दलासाठी नवीन आकृतीबंध तयार करून ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.
Maharashtra Police Bharti 2023 – आत्तापर्यंतची ही विक्रमी भरती मानली जात आहे. राज्य सरकारला याहून अधिक पदांची भरती करायची होती. पण राज्यात प्रशिक्षण सुविधा पुरेशी नसल्याने आधी त्यामध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न असल्याची माहिती उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधानसभेत दिली. तसेच राज्यात पोलिसांची कधीही कंत्राटी भरती केली जाणार नाही, याचा पुनरुच्चारही त्यांनी केला.
विधानसभेत सत्ताधारी पक्षाने उपस्थित केलेली अल्पकालीन चर्चा आणि विरोधी पक्षाने नियम 293अंतर्गत केलेल्या चर्चेला देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत उत्तर दिले. यावेळी त्यांनी पोलिस दलात सुरू असलेल्या भरती प्रक्रियेची माहिती दिली.
सध्या मुंबई आणि पुणे पोलिस दलात 10 हजार पदे रिक्त आहेत. त्यामुळे त्यांच्या विनंतीनुसार सुरक्षा महामंडळातील काही पोलिस 11 महिन्यांसाठी देण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये कुठलाही बाहेरचा कंत्राटदार नाही. 1960 चा आकृतीबंध आत्तापर्यंत वापरण्यात येत होता.