Maharashtra Talathi Bharti नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या या पोस्टमध्ये आपल्या विद्यार्थी मित्रांसाठी एक मोठी बातमी घेऊन आलेलो आहोत. तसे तर आपण दररोज शेती विषयक माहिती आणि नोकरी विषयक जाहिराती आपण आपल्या सर्व मित्रांसाठी टाकत असतो जेणेकरून याचा त्यांना एक प्रकारे फायदा होत असतो. तर मित्रांनो आपण नोकरीची जाहिरात यासाठी टाकतो की आपली परिस्थिती स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत आणि त्यांना योग्य वेळेवर योग्य संधी मिळणे हे खूपच गरजेचे आहे.
तलाठी भरती प्रक्रिया अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
मित्रांनो आज आपण तलाठी भरती बद्दल निघालेले शासन निर्णय बद्दल बोलणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो आपले बरेचसे मित्र असे आहेत की बऱ्याच दिवसापासून ते तलाठी भरतीची तसेच ग्रामसेवक भरतीची अशा विविध प्रकारच्या भरतीची वाट पाहून आहे जे की कठोर मेहनत आणि परिश्रम करत आहेत. आणि त्यांच्या मेहनतीला फळ आलेले आहे कारण की आता लवकरच तलाठी भरती सुरू होणार आहे त्यासाठी अधिकृत शासन निर्णय देखील आला आहे त्यामध्ये जागांचा तपशील आणि कुठे किती जागा आहेत याचा सर्व तपशील आपल्याला पाहायला मिळणार आहे. यासाठी तलाठी भरतीसाठी एक समिती नेमलेली असून याचा सध्या अहवाला आम्ही तुम्हाला दाखवणार आहे दाखवणार आहोत की त्यांनी किती जागांसाठी जीआर वगैरे काढलेला आहे.
मित्रांनो तलाठी भरती संदर्भामध्ये एक शासन निर्णय नवीन शासनाने काढलेला असून महाराष्ट्र राज्यामध्ये तलाठी महासंघाची जी मागणी होती ती तलाठी भरती घेण्यात यावी त्यानुसार जे समिती नेमली होती त्यांनी चार हजार तलाठी पदांसाठी मंजुरी देण्यात आलेली आहे आणि याचा व्यवस्थित तपशील आपण या पोस्टमध्ये देणार आहोत. राज्यामध्ये तलाठी सज्जा मंडळ तसेच कार्यालयांसाठी तब्बल चार हजार तलाठी पदासाठी आणि 520 मंडळ अधिकारी पदांसाठी ह्या भरतीला शासनाकडून मान्यता मिळाली आहे.
हे पण वाचा, सरकारचा मोठा निर्णय, फक्त 100 रुपयाच्या एका बाँड वर जमीन होणार नावावर.
या समितीने दिलेल्या अहवालानुसार अंमलबजावणी होत याच्या दृष्टीने पुढील निर्णय घेण्यासाठी महसूलमंत्र्याच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ बैठक तसेच उपस समिती सुरू करण्याचा अहवाल देखील या शासन निर्णयांमध्ये घेण्यात आलेला आहे. आणि यास अंतर्गत महसूल विभागांमधून महाराष्ट्र राज्यामध्ये तब्बल 4000 तलाठी पदाच्या आणि 520 मंडळ अधिकारी पदाच्या जागा भरण्याचा अधिकृत शासन निर्णय हा जारी करण्यात आलेला आहे. यामध्ये या विभागामध्ये ही पदे भरण्यात येणार आहेत पुणे महसूल विभागामध्ये सांगली, सातारा, कोल्हापूर, या जिल्ह्यांमध्ये तलाठी पदांची भरती होणार आहे.
अमरावती महसूल विभागामध्ये अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम, या जिल्ह्यांमध्ये तलाठी भरती होणार आहे.
नागपूर महसूल विभाग अंतर्गत होणाऱ्या भरतीमध्ये नागपूर, चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, या जिल्ह्यांमध्ये तलाठी भरती होणार आहे.
औरंगाबाद व महसूल विभागाचे अंतर्गत होणाऱ्या तलाठी भरती मध्ये औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, बीड, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, या जिल्ह्यांमध्ये तलाठी भरती होणार आहे.
तर मित्रांनो या भरती विषयी अधिकृत तपशील घेण्यासाठी वरती दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही अधिकृत जाहिरात पाहून घ्यावी तसेच खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही अधिकृत संकेतस्थळ वर याची पूर्णपणे माहिती घेऊ शकता.
तलाठी भरती प्रक्रिया अधिकृत संकेतस्थळ वर भेट देण्यासाठी इथे क्लिक करा.