Kukkut palan yojana कुक्कुटपालन योजनेच्या अनुदानामध्ये वाढ, पहा अधिकृत शासन निर्णय आणि करा लगेच अर्ज.

Poultry Farming Government New GR 2023 नमस्कार मित्रांनो आज आपण कुक्कुटपालन योजनेच्या अनुदानाविषयी आपल्या सर्व शेतकरी बांधव तसेच आपल्या सर्व तरुण मित्रांना सांगणार आहोत जे की खूप मोठ्या प्रमाणात अनुदान सध्या वाढवण्यात आलेले असून याबाबत एक अधिकृत शासन निर्णय देखील निघालेला आहे आणि तोच शासन निर्णय आज आपल्याला या पोस्ट अंतर्गत पाहायचा आहे आणि तुम्हाला अर्ज या योजनेमध्ये करायचा असल्यास ऑनलाईन पद्धतीने अर्ज देखील करू शकता. मित्रांनो आपले शेतकरी मित्र हे शेती तर करतच असतात पण त्यासोबत काही जोडधंदा म्हणून पशुपालन किंवा कुक्कुटपालन अशा नवीन जोड धंदा ही शेती सोबत करत असतात आणि तरच त्यांना काहीतरी आर्थिक लाभ होतो आणि त्यांच्या आर्थिक जीवनमान तसेच आर्थिक परिस्थिती सुधारते आणि त्यामध्येच आता नवीन चांगली बातमी म्हणजे कुक्कुटपालन योजनेसाठी सरकारने अनुदानात मोठ्या प्रमाणात वाढ केली असून यासाठी अधिकृत शासन निर्णय देखील आलेला आहे आणि तो आपल्याला आज पाहायचा आहे.

 

कुक्कुटपालन अनुदान योजना अधिकृत शासन निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

 

Poultry Farming Subsidy Scheme Maharashtra मित्रांनो जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेअंतर्गत एकात्मिक कुक्कुटपालन विकास योजना ही राज्यांमध्ये 2010 पासून चालू आहे आणि बऱ्याचशा शेतकरी बांधव तसेच इतर आपल्या मित्रांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे. आणि या योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना 50 टक्के अनुदानावर अंडी उत्पादनासाठी तलंगा गट आणि या गटामध्ये 25 तरंगा आणि तीन नर कोंबड्या असतात व 100 एक दिवशीय सुधारित कुकुट पक्षांच्या पिल्लांचे गट वाटप केले जाते आणि अशा पद्धतीचे हे अनुदान देण्यात येते. आणि सद्यस्थितीत अंडी उबवण्याची तेलंगाना कोंबडी या एकदिवसीय कुक्कुट पिल्ले या सर्वांच्या किमतीमध्ये सुद्धा सध्या वाढ झालेली आहे. आणि त्याप्रमाणेच कुक्कुटपालन साठी लागणारे जे खाद्य आहे या कच्च्या मालाच्या किमती औषधी आणि इंधनांमध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणात वाढ झालेली असल्याने कुक्कुट खाद्य तसेच कुक्कुट पक्षांना लागणारे औषधे आणि वाहतूक खर्च तो देखील वाढल्यामुळे शासनाकडून सुद्धा अनुदानात चांगल्या प्रकारे आता वाढ करण्यात आलेली आहे.

 

हे पण वाचा,अतिक्रमण केलेली शेत जमीन परत मिळणार फक्त 2 दिवसांमध्ये, अशा पद्धतीने करा अर्ज.

 

 

याचमुळे या योजनेमध्ये वाटप करण्यात येणारे तरंगा व नरकोंबडे आणि एक दिवशी कुकूट पक्षी यांच्या गटामध्ये जे अनुदान पहिले मिळत होते यामध्ये चांगल्या प्रमाणात वाढ करून यासाठी काही निश्चित बाबी ठरवण्यात आलेल्या असल्याने याबाबत अनुदानात शासनाकडून वाढ करण्यात चांगल्या प्रकारे आलेली आहे. जिल्हा वार्षिक सर्वसाधारण एकात्मिक विकास योजनेच्या मदतीने 50 टक्के अनुदानावर अंडी उत्पादन साठी वाटप करण्यात येणाऱ्या तरंगा आणि नरकोंबडे तसेच एक दिवसीय कुकुट पक्षी यांच्या गटाच्या ज्या किमती आहेत त्या शासन निर्णयानुसार वार्षिक सर्वसाधारण 50 टक्के अनुदानावर वाटप करावयाच्या शासनाकडून ठरवण्यात आले. तर मित्रांनो अशा प्रकारचे अनुदानात वाढ झालेली असून तुम्हालाही या योजनेमध्ये अर्ज करायचा असल्यास खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि वरती दिलेल्या लिंक वर क्लिक करून अधिकृत शासन निर्णय पहा.

 

 

कुक्कुटपालन योजनेमध्ये ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.