10 वी उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांना केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल मध्ये तब्बल ७० हजार रुपये पगाराची नोकरी करण्याची सुवर्णसंधी.!!

CISF Recruitment 2023 नमस्कार मित्रांनो आज आपण आपले या पोस्टमध्ये केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल मध्ये जी भरती प्रक्रिया निघालेली आहे या भरती प्रक्रियेबद्दल आपल्या विद्यार्थी मित्रांना मोठी आणि चांगली आजची अपडेट देणार आहोत. मित्रांनो केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलामध्ये विविध रिक्त पदांसाठी ही भरती प्रक्रिया निघाली असून अर्ज करण्याची तारीख ही जवळच आलेली आहे आणि या सीआयएसएफ म्हणजेच केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल भरतीची अर्ज प्रक्रिया 21 जानेवारी 2023 पासून सुरू झालेली होती. आणि आता शेवटची तारीख जवळच असून तुम्हाला शेवटची तारीख ही खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून अधिकृत जाहिरात मध्ये पाहायला मिळणारच आहे. तर मित्रांनो या भरतीमध्ये अर्ज करायचा असल्यास रिक्त पदांबद्दल तुम्हाला सांगायचं झालं तर रिक्त पदे ही कॉन्स्टेबल, ड्रायव्हर, आणि ड्रायव्हर कम पंप ऑपरेटर या विविध रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया ही सुरू आहे. आणि मित्रांनो यासाठी तुमचे फक्त दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे आणि तुम्हाला अर्ज जर करायचा असला तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून अगोदर अधिकृत जाहिरात पाहून घ्या.

 

 

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल भरती अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

 

 

मित्रांनो केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल भरती मध्ये जारी जागा निघालेले आहे याबद्दल शैक्षणिक पात्रतेबद्दल बोलायचं जर झालं तर शैक्षणिक पात्रता ही तुमच्यासाठी फक्त दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. आणि या सोबतच तुम्हाला जर ड्रायव्हर साठी अर्ज करायचा असेल तर अवजार मोटार वाहन किंवा वाहतूक वाहन किंवा इतर कुठलेही हलकी मोटर वाहन तसेच तुमची टू व्हीलर चालवण्याचा ड्रायव्हिंग लायसन्स तुमच्याकडे असले पाहिजे. आणि याशिवाय उमेदवारांची उंची 165 सेंटीमीटर पेक्षा कमी नसावी आणि महिला उमेदवारांची उंची 155 सेंटीमीटर पेक्षा कमी नसावी. या भरतीमध्ये तुम्हाला अर्ज करायचा असेल तर वयोमर्यादेबद्दल सांगायचं झालं तर वयोमर्यादा ही खूपच कमी असून यामध्ये 18 ते 27 च्या आत तुमचे वय असणे आवश्यक आहे. तसेच अनुसूचित जातींसाठी हे वयामध्ये शिथिलता देण्यात आलेली आहे. या भरतीमध्ये अर्ज करायचा असेल तर अर्ज शुल्क हे फक्त शंभर रुपये तुम्हाला भरावे लागणार आहे आणि अनुसूचित जातीतील उमेदवार तुम्ही जर असाल तसेच महिला उमेदवारांना कुठलेही शुल्क भरण्याची गरज नाही. तर मित्रांनो खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.

 

 

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल भरती मध्ये अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.