Fire Brigade Bharti Mumbai अग्निशामक दलामध्ये फक्त बारावी पास वर कोणतीही परीक्षा न देता थेट भरती सुरू.

Fire Brigade Recruitment 2023 नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या या पोस्टमध्ये अग्निशामक दलाची जी भरती निघालेली आहे त्या भरती बद्दल बोलणार आहोत आणि ही भरती मुंबई महानगरपालिके अंतर्गत असून या भरतीसाठी तुम्हाला कुठलीही परीक्षा न देता फक्त मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया होणार आहे. मित्रांनो आपले बरेचसे मित्र आहेत जे की स्पर्धा परीक्षेची तयारी करीत आहेत आणि ते अशा पोलीस भरती तसेच फायर ब्रिगेड भरती आणि इतर ज्या काही भरती निघत आहेत त्या भरतीची तयारी सुद्धा करत आहेत. Mumbai mahanagar palika Corporation Recruitment 2023 बरेचसे मित्र खूप गोरगरीब घरातली असून ते फक्त सरकारी नोकरीची वाट पाहत आहे जेणेकरून त्यांना सुद्धा सरकारी नोकरी करता येईल आणि कुठेतरी त्यांच्या जीवनाचे चीज तसेच त्यांच्या कष्टाचे चीज व्हावे असे त्यांच्या जीवनाचे उद्देश असते आणि अशा मित्रांसाठी आणि दररोज आपल्या या न्यूज पोर्टलवर विविध सरकारी नोकरीच्या जाहिराती टाकत असतो जेणेकरून त्यांचा फायदा व्हायलाच हवा. Fire Extinguisher Recruitment Mumbai

 

 

अग्निशामक दल भरती अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

 

BMC MUMBAI JOBS तर मित्रांनो आजची आपली जाहिरात अशी की मुंबईमधील अग्निशामक दलाची रखडलेली भरती होती पण आता सध्या 13 जानेवारीपासून ही भरती प्रक्रिया सुरू असून ही भरती प्रक्रिया तब्बल सात वर्षानंतर दहिसर येथील भावदेवी मैदानामध्ये फक्त मुलाखतीद्वारे सुरू झालेली आहे आणि या मुलाखती तब्बल 4 फेब्रुवारी पर्यंत चालणार आहे. आणि मित्रांनो मुलाखतीचा पत्ता सुद्धा खाली दिलेलाच आहे तर तुम्ही थेट मुलाखतीला हजर राहायचे आहे. मित्रांनो मुलाखतीला जाण्या अगोदर तुम्ही वरती दिलेल्या लिंक वर क्लिक करून अधिकृत जाहिरात म्हणजेच जी भरतीची आधी सूचना आहे ती पाहून घ्यावी जेणेकरून तुम्हाला पदानुसार पात्रता तसेच पगार आणि इतर सर्व अधिकृत माहिती जी आहे ती तुम्हाला वरती दिलेल्या अधिसूचनेमध्ये समजणार आहे.

 

 

हे पण वाचा, महावितरण मध्ये वीजतंत्री आणि तारतंत्री या पदांसाठी फक्त दहावी पास वर मोठी भरती प्रक्रिया सुरू.

 

 

 

रिक्त पदाचे नाव : अग्निशामक

पगार किती मिळेल ? रु. 21,700 – 69,100/- पर्यंत मिळेल

शैक्षणिक पात्रता काय आहे ? 50% मार्क्ससह कला किंवा विज्ञान नाहीतर वाणिज्य शाखेतील 12वी उत्तीर्ण किंवा 10वी पास असायला हवे.

 

वयोमर्यादा काय असेल ?: कमीत कमी 20 ते जास्तीत जास्त 25 वर्ष

परीक्षा शुल्क किती आहे ? : सर्वसाधारण प्रवर्ग रु. 944/- मागासवर्गीय प्रवर्गातील : रु. 590/-

नोकरी ठिकाण कोणते आहे ? : मुंबई (महाराष्ट्र)

या पत्यावर मुलाखत होणार – लोकनेते गोपीनाथ मुंडे शक्ती मैदान (भावदेवी मैदान), जे.बी.सी.एन. शाळेच्या बाजूला, विनी गार्डन सोसायटी समोर, मंडपेश्वर, दहिसर (पश्चिम), मुंबई – ४००१०३

 

 

हे पण वाचा,पोस्ट ऑफिस मध्ये फक्त मुलाखती द्वारे मेगा भरती सुरू, पात्रता फक्त दहावी पास.

 

 

भरतीसाठी हजर राहावयाची तारीख : दि. 13 जानेवारी ते 04 फेब्रुवारी 2023 पर्यंत कधीही