Ration Card 2023 रेशन कार्ड मध्ये कुटुंबातील सदस्यांची नावे अशा प्रकारे जोडा फक्त 5 मिनिटात ऑनलाईन पद्धतीने.

Ration Card Update Today नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या पोस्टमध्ये तुम्हाला महत्त्वपूर्ण असे विचार सांगणार आहोत जो की राशन कार्ड धारकांसाठी महत्त्वपूर्ण असा विषय आहे आणि खूप अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत जे की राशन कार्ड मध्ये आपल्याला नाव कशा पद्धतीने जोडता येणार आहे आणि याची काय प्रोसेस आहे हे आपल्याला आज या पोस्टच्या अंतर्गत पाहायचे आहे. मित्रांनो समजा तुमचे जर लग्न झाले तर नवीन जो सदस्य येणार आहे त्या सदस्याचे नाव कशा पद्धतीने राशन कार्ड वर जोडायचे किंवा आपल्याला लहान मुलं बाळ आहेत त्यांचे देखील नाव जर राशन कार्ड मध्ये जोडायचे असतील तर कशा पद्धतीने जोडायचे आहे? तर त्यासाठी मित्रांनो कुठेही जाण्याची गरज नाही तुम्ही एकदम सोप्या पद्धतीने तुमच्या मोबाईलवरून देखील घरातील सदस्यांची नावे आता राशन कार्ड वर जोडू शकणार आहात. तर चला तर मित्रांनो जाणून घेऊया या विषयी सविस्तर माहिती.

 

 

कुटुंबातील सदस्याचे नाव राशन कार्ड मध्ये जोडण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

 

Ration Card Big News Today मित्रांनो सर्वसामान्य गोरगरीब लोकांना शासनाकडून स्वस्त दरात रेशन धान्य मिळावे यासाठी राशन कार्ड हे अत्यावश्यक आहे आणि ते प्रत्येक नागरिकांकडे असतेच. मित्रांनो कोरोनाच्या कठीण काळामध्ये खाद्य तेलापासून ते गहू आणि मिठापर्यंत सर्वकाही सरकारकडून मोफत वाटप करण्यात आले. आणि तुम्हाला तर माहीतच आहे की प्रत्येकाला राशन कार्ड वर मोफत राशन धान्य मिळत नाही. राशन कार्ड मिळवण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी असतात त्यासाठी लोकांना काही कागदपत्रे सादर करावे लागतात. आणि समजा मित्रांनो आजच्या काळामध्ये ओळख पडताळणीसाठी बरीचशी महत्त्वाची कागदपत्रे वापरले जातात आणि या कागदपत्रांमध्ये राशन कार्ड हा एक खूप महत्त्वाचा कागद आहे जो की तुमच्या ओळखीचा मोठा पुरावा आहे. शिधापत्रिका ओळखपत्र म्हणून सुद्धा वापरता येते आणि स्वस्त किंवा मोफत राशन मिळण्यासाठी सुद्धा शिधापत्रिका म्हणजेच राशन कार्ड चा वापर हा करण्यात येतो. शिधापत्रिकेत नोंदवलेल्या माहितीनुसार आपल्याला राशन कार्ड हे म्हणजेच राशन धान्य मिळत असते. आणि त्याच बरोबर इतर बऱ्याचश्या सरकारी योजनांचा लाभ आपल्याला घ्यायचा असेल तर त्यासाठी सुद्धा राशन कार्ड चा वापर केला जातो आणि या राशन कार्ड वरच या शासकीय योजना आपल्याला मिळत असतात.

 

आणि मित्रांनो काही वेळा कुटुंबाचा विस्तार झाला किंवा विभाजित कुटुंब जर झालं तर कुटुंबामध्ये काही सदस्यांचे नाव कमी किंवा काही सदस्यांचे नाव जोडायचे असते. तर त्या नव्या सदस्यांची नावे सुद्धा आपल्याला राशन कार्ड मध्ये जोडावे लागतात. आणि मित्रांनो लग्नानंतर जेव्हा आपले कुटुंब मोठे होते किंवा घरात मूळ बाळ जन्माला येते किंवा दत्तक जर घेतली असेल तेव्हा सुद्धा आपल्याला राशन कार्ड या सदस्यांची नाव नोंदणी ही करावीच लागते. आणि आपल्या कुटुंबातील एखाद्या सदस्याचे नाव जर चुकले असेल यासाठी अपडेट सुद्धा करायचं असेल तर तुम्हाला हे सुद्धा ऑनलाईन पद्धतीने करावी लागते. तर चला तर मित्रांनो काही टिप्स आपण जाणून घेऊया त्या आधारे तुम्ही ऑनलाईन पद्धतीने राशन कार्ड वर नवीन कुटुंबातील नवीन सदस्यांची नावे ऑनलाईन पद्धतीने फक्त पाच मिनिटात जोडू शकणार आहात.

 

 

हे पण वाचा, तुम्हाला रेशन धान्य मिळते किती ? आणि दुकानदार देतो किती ? हे चेक करा ऑनलाईन पद्धतीने.

 

 

 

अशा पद्धतीने राशन कार्ड मध्ये नवीन सदस्याचे नाव जोडा.

1) सर्वात अगोदर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.

2) आता मित्रांनो तुम्हाला एक लॉगिन आयडी बनवायचा आहे जर तुमच्याकडे अगोदरच लॉगिन आयडी असेल तर त्यासोबत तुम्ही लॉगिन करू शकता.

3) होमपेजवर आल्यानंतर नवीन सदस्य जोडण्याचा एक ऑप्शन आपल्याला दिसेल त्या ऑप्शन वर क्लिक करा.

4) या ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर एक नवीन फॉर्म ओपन होणार आहे.

5) या फॉर्ममध्ये आपल्याला आपल्या कुटुंबातील जे नवीन सदस्यांची माहिती आहे त्यांचं नाव आहे ते योग्य रीतीने भरून सबमिट करावे लागेल.

6) आणि या फॉर्म सोबत आपल्याला आवश्यक कागदपत्रांची सॉफ्ट कॉपी सुद्धा ऑनलाईन पद्धतीने अपलोड करावी लागणार आहे.

7) नंतर फॉर्म हा सबमिट केल्यानंतर एक रजिस्ट्रेशन नंबर आपल्याला मिळेल.

8) या रजिस्ट्रेशन नंबरच्या आधारे तुम्ही ऑनलाईन या संकेतस्थळावर तुमचा आपलिकेशन म्हणजेच फॉर्म स्टेटस चेक करू शकता की हे सक्सेसफुल झाले आहे की नाही.

9) नंतर काही दिवसांनी अधिकारी ऑनलाईन पद्धतीने तुमचे कागदपत्रे तपासतील.

10) जर सगळे व्यवस्थित असेल म्हणजे कागदपत्रे बरोबर असतील तर तुमचा अर्ज स्वीकारला जाईल आणि काही दिवसांनी नवीन राशन कार्ड तुम्हाला पोस्टाद्वारे तुमच्या घरी पोहोचविण्यात येईल.

 

तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण कुटुंबातील नवीन सदस्याचे नाव राशन कार्ड जोडू शकतो. तर मित्रांनो खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि ऑनलाईन पद्धतीने तुम्ही राशन कार्ड वर नाव जोडू शकता त्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

 

 

कुटुंबातील सदस्याचे नाव राशन कार्ड मध्ये जोडण्यासाठी इथे क्लिक करा.